
अल कायदा या दहशतवादी संघटनेने गुजरातमधील द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून मंदिर परिसरातील सुरक्षा वाढवली आहे. मंदिराच्या दिशेने येणाऱया प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. तसेच शहरातील सर्व बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांमध्येही प्रवाशांची तपासणी केली जात आहे. द्वारका जिह्याच्या तिन्ही बाजूंनी समुद्र असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. तसेच येथे दररोज हजारो भाविक भेट देतात.
























































