ऑल इंडिया मुस्लिम ओ.बी.सी.ऑर्गनायझेशनचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम ओ.बी.सी.बांधवांना देण्यात येणारे दाखले, होणारी जात पडताळणी, मुस्लिम ओ.बी.सी.बांधवांना मिळणाऱ्या इतर सेवा राबवण्यात रत्नागिरी जिल्हा प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप करत ओ.बी.सी. मुस्लिम ऑर्गनायझेशनने मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका प्रमुख आणि तालुक्यातील महत्वाचे पदाधिकारी यांची रत्नागिरी येथे नुकतीच सभा संपन्न झाली. मुस्लीम समाजाला शासनाने अनेक सेवा व सवलती दिल्या असून त्या राबवण्यासाठी प्रशासनकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप सभेत करण्यात आला. मुस्लिम ओ.बी.सी.मुलांच्या शैक्षणिक कामी लागणारे सर्व दाखले देण्यास ही विलंब होत आहे. जिल्ह्यात शासन दरबारी मुस्लिम समाजाला वेठीस धरण्याचे काम करत आहेत. त्यामुळे प्रशासना विरोधात सर्व ओ.बी.सी.बांधव संघटीत झाले असून अधिकारी वर्गाला जाब विचारणार आहेत. त्यासाठी जिल्हा अॅड-हॉक कमिटी स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये जिल्ह्यास्तरावर अमजद बोरकर, हारीस शेकासन, कमालुद्दीन कोंडेकर, रमजान गोलंदाज, नदीम सोलकर, शकील तांबे, जमुरत अलजी, फैयाज मुकादम, मोहीद्दीन तलवेरकर, रहीम दलाल, शौकत गोलंदाज, सिकंदर मुजावर, जिकू बावाणी, महिला आघाडी मध्ये रझीया काझी, सलमा काझी, सिध्दीका बाग, नसिमा डोंगरकर यांची निवड करण्यात आली आहे.

या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. ही संघटना फक्त दाखल्यापूर्ती मर्यादीत न राहता जिल्ह्यातील प्रत्येक मुस्लिम मोहल्यातील मुस्लिम समाज व ओ.बी.सी. घटकांसाठी शासनस्तरावर राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची जनजागृती करणार आहे. मुस्लिम समाजातील तरूणांना रोजगार व स्वयं रोजगारासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या संघटनेत मुस्लिम समाजातील ओ.बी.सी.बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन हारीस शेकासन यांनी केले आहे. यावेळी रशीद साखरकर, डॉ. शेकासन, रशीद दाभेलकर, गुलाम डावरे, किस्मत मालपेकर, रफीक मुकादम, फरहान कापडे, आब्बास आंबेडकर, मुश्ताक टेंमकर, शब्बीर भाटकर, मलिक गडकरी, मजिद सायेकर, बशीर खतीब, जावेद परदेशी, निसार रजपूरकर, शकुर संगमेश्वरी, अकील साखरकर उपस्थित होते.