Amarnath Yatra 1 जुलैपासून अमरनाथ यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, भोपाळ

1 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणीअर्ज भरण्यास 1 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या अर्जात भाविकांना यात्रेच्या निवडलेल्या मार्गाची नोंददेखील करावी लागणार आहे.

यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रा 46 दिवस चालणार आहे. नोंदणीच्या मुदतीत प्रत्येक दिवशी एकूण 160 नोंदणी घेतल्या जाणार आहेत. यातील 80 बालाटाल आणि 80 पहलगाम या अमरनाथ गुहेपर्यंत जाणाऱ्या मार्गांसाठी नोंदणी असणार आहे. नोंदणीअर्जाचे शुल्क 50 रुपये एवढे असून अर्जात भाविकांना कोणत्या मार्गाने यात्रा करणार आहे त्या मार्गाचा उल्लेख करावा लागणार आहे. भाविकांना यात्रेसाठी जी तारीख मिळाली आहे त्या तारखेलाच यात्रा सुरू करणे अनिवार्य असणार आहे.

आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक

अमरनाथ यात्रेत सहभागी होण्यासाठी अमरनाथ श्राइन बोर्डद्वारा नियुक्त आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेले आरोग्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे यात्रेकरूंचा वीमादेखील उतरवला जाणार आहे. यंदाच्यावर्षी सुमारे 35 ते 40 हजार यात्रेकरू अमरनाथ यात्रेत सहभागी होण्याची शक्यता आहे.