अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन स्थापणार कोरोना टास्क फोर्स, भारतीय वंशाचे विवेक मूर्तीं होणार सहअध्यक्ष!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन लवकरच कोरोनासंदर्भातील टास्क पर्ह्सची स्थापना करणार असून भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले डॉ. विवेक मूर्ती यांची या टास्क पर्ह्सच्या सहअध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. सोमवारी याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी शनिवारी रात्री डेलावेयरच्या विलमिंगटनमध्ये आपल्या विजयाच्या भाषणात जाहीर केले होते की, आम्ही कोविड संदर्भातील योजनांच्या मदतीसाठी देशातील आघाडीच्या वैज्ञानिक व विशेषज्ञांच्या गटाची घोषणा करणार असून 20 जानेवारी 2021 पासून त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. सहअध्यक्षपदासाठी बायडन यांनी पुणाच्याही नावाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी वॉशिंग्टन पोस्टने डॉ. मूर्ती आणि डेविड केसलर यांची नियुक्ती होऊ शकते असे म्हटले आहे. डेविड केसलर हे माजी खाद्य आणि औषध प्रशासन आयुक्त होते. निवडणूक प्रचाराच्या काळात डॉ. मूर्ती हे बायडन यांचे कोरोना विषाणूच्या मुद्दय़ावर सर्वोच्च सल्लागार होते. त्यामुळे त्यांना आरोग्यमंत्रीपदही मिळू शकते असे वृत्तात म्हटले आहे.

मूळचे कर्नाटक राज्यातील वंश असलेले आणि ब्रिटनमध्ये जन्मलेले विवेक मूर्ती यांना सन 2014 मध्ये तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेचे 19 वे सर्जन जनरल म्हणून नियुक्त केले होते. नंतर मात्र ट्रम्प यांनी त्यांना या पदावरून हटवले होते.