काँग्रेस लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सबका साथ, सबका विकास, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोरण आहे. मात्र काँग्रेस लोकांमध्ये बोडो आणि इतर, आसामी-बंगाली, हिंदू-मुस्लिम, आदिवासी-बिगरआदिवासी अशी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.

आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी कामरूप येथे प्रचारसभा घेतली. या सभेमध्ये भाषणादरम्यान शहा यांनी काँग्रेसवर फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप केला. तसेच भाजपा सत्तेत आल्यानंतर राज्याचा सर्वसमावेशक विकास करण्यास प्राधान्य देण्यात येईल. अल्पसंख्यांसहित सर्वांसमान सोयी उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

आम्ही जेव्हा घरोघरी पाणी पुरवू तेव्हा प्रत्येक घरात पाणी पुरवले जाईल. आम्ही जेव्हा सर्वांना घरं देऊ तेव्हा त्यामध्ये अल्पसंख्याक समाजातील लोकांचाही समावेश असेल. अल्पसंख्याक, आदिवासी, बोडो या सर्वांना 10 हजार रुपयांची मदत केली जाईल. शेतकऱयांनाही आसाम सरकार मदत करेल, असे अमित शहा म्हणाले.