
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मतदानाच्या तारखा जस जशा जवळ येत आहेत, तस तसा प्रचार शिगेला पोहोचत आहे. गांधीनगर मधून आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या प्रचारात सर्व विरोधी पक्षांना धारेवर धरले आहे. आत्या, भाचा, आजोबा कोणीही येऊदे परंतु ते आता भाजपला हरवू शकत नाही अशी टीका अमित शहा यांनी सपा, बसपा व राष्ट्रिय लोक दल पक्षांवर केली. उत्तर प्रदेशमधील एका सभेत ते बोलत होते.
Amit Shah: A different coalition has happened in UP, ‘bua-bhatija & dada’ have come together. Isn’t Ajit Singh at an age where he should be a grandfather or a great-grandfather? They think they can defeat BJP, include Rahul baba&Priyanka Vadra too, you won’t be able to defeat BJP pic.twitter.com/td4Mldzcr7
— ANI UP (@ANINewsUP) March 31, 2019
अमित शहा म्हणाले की, “उत्तर प्रदेशमध्ये एक वेगळेची आघाडी झाली आहे. आत्या, भाचा आणि आजोबा एकत्र आले आहेत. अजित सिंह यांचे वय पाहून असे नाही वाटत का ते आता आजोबा किंवा पणजोबा झाले आहेत? त्यांना वाटतं की ते भाजपला हरवू शकतात.” राहुल बाबा, प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मिळून जरी ठरवले तरी ते भाजपला हरवू शकत नाहीत असे शहा यांनी म्हटले.
























































