अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा रद्द

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचा 15 फेब्रुवारीला होणारा महाराष्ट्र दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. या दौऱयात छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची जाहीर सभा होणार होती. तसेच जळगावच्या युवा संमेलनालाही ते उपस्थित राहणार होते. पण आज तो दौराच रद्द करण्यात आला. शहा यांचा दौरा रद्द झाल्याबद्दल जळगाव जिल्हा प्रशासनाकडून दुजोरा देण्यात आला. मात्र त्यामागचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.