अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल; निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात तेलंगणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेलंगणातील काँग्रेस पक्षाच्या युनिटने त्यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (TPCC) उपाध्यक्ष निरंजन रेड्डी यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की 1 मे रोजी भाजपच्या रॅलीदरम्यान अमित शहांसोबत काही मुले स्टेजवर दिसली होती.

निरंजन रेड्डी म्हणाले की, रॅलीदरम्यान एका मुलाने हातात भाजपचे चिन्ह धरलेले दिसले आणि त्याला आदर्श आचारसंहितेचे (एमसीसी) उल्लंघन म्हटले जाते.

रेड्डी यांनी तेलंगणाच्या सीईओला पाठवलेल्या ई-मेलमध्ये पुढे असा दावा करण्यात आला आहे की, ‘निवडणूक आयोगाने अलीकडेच राजकीय पक्षांना मुलांचा वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत आणि निवडणूक-संबंधित मोहिमांमध्ये किंवा कृतींमध्ये त्यांचा सहभाग घेऊ नका’, असं बजावलं आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी निरंजन रेड्डी यांची तक्रारीची योग्यता आणि तथ्य तपासण्यासाठी हैदराबाद पोलिसांकडे पाठवली, त्यानंतर त्यांनी गुरुवारी अमित शहा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला.

टी यमन सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते जी किशन रेड्डी आणि आमदार टी राजा सिंह हे या प्रकरणातील इतर आरोपी आहेत.

आयपीसी कलम 188 (लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपने माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे, ज्या विद्यमान खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी लढतील.

हैदराबादमध्ये 13 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.