अमित-मिताली यांचे शुभमंगल; राज्यपाल, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवरांचे शुभाशीर्वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा विवाह रविवारी लोअर परळ येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये पार पडला. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राजकीय, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यकरांनी उपस्थित राहून वधुवरांना शुभाशीर्वाद दिले.

यावेळी सौ. रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, उद्योगपती रतन टाटा, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, अभिनेता आमीर खान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, गायिका पद्मजा फेणाणी, भाजपच्या प्रवक्त्या शायना एन.सी., अमृता फडणकीस, रितेश देशमुख, अमित देशमुख, साजिद खान, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आदी मान्यवर उपस्थित हेते.

लोअर परळ येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये रविवारी दुपारी 12 वाजून 51 मिनिटांच्या मुहूर्तावर अमित आणि मिताली विवाहबद्ध झाले. त्यानंतर सायंकाळी रिसेप्शन सोहळा रंगला.. यावेळीही अनेक मान्यवर उपस्थित होते. मिताली फॅशन डिझायनर असून प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. संजय बोरुडे यांच्या त्या कन्या आहेत.