बॉलीवूडमधील ज्येष्ठ नेते अमिताभ बच्चन यांनी मुंबईत अवघ्या चार वर्षांत 194 कोटी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 2020 ते सप्टेंबर 2024 या वर्षात अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांनी मुंबईत 1,80,000 स्क्वेअर फूट रेसिडेन्शियल, कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली असून यासाठी 194 कोटी रुपये मोजले आहेत. इंटिग्रेटेड रियल इस्टेट मार्पेट प्लेस स्क्वायर यार्डस्ने यासंबंधी माहिती दिली आहे. या चार वर्षांत बॉलीवूडमधील ज्या सेलिब्रिटींनी जेवढी प्रॉपर्टी खरेदी केली आहे, त्यात बच्चन कुटुंबाने एक तृतीयांश प्रॉपर्टी खरेदी केली आहे. अमिताभ बच्चननंतर सर्वात जास्त प्रॉपर्टी अभिनेत्री जान्हवी कपूरने खरेदी केली. 18550 वर्ग फूटची प्रॉपर्टी खरेदी केली असून यासाठी 170 कोटी रुपये मोजले आहेत.
अजय देवगण, रणवीर सिंह या अभिनेत्यांनी मुंबईत 100 कोटींहून अधिक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. मिंटच्या माहितीनुसार शाहरुख खान, शिल्पा शेट्टी, अक्षय पुमार, ऐश्वर्या राय-बच्चन, हृतिक रोशन, राणी मुखर्जी, आलिया भट, दिशा पाटणी यांनी मुंबईत कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी खरेदी केली आहे.