अमिताभ बच्चन यांचे नाव, चेहरा आणि आवाज परवानगीशिवाय वापरता येणार नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज, नाव आणि चेहरा यापुढे त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही वापरता येणार नाही. याबाबतचे आदेश शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच दूरसंचार मंत्रालयासह संबंधित विभागाला अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित गोष्टी हटवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.