अमरावतीत 3 देशीकट्टे व 8 काडतूस जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज केलेल्या कारवाईत 3 देशीकट्टे व 8 जिवंत काडतूस जप्त करून 2 आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई नागपुरी गेट पोलीस ठाणे हद्दीतील गौसनगर येथे करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या पोलिसांना गौसनगर येथील आरोपी शेख सलीम शेख अफसर (26) व मोहम्मद अवेस मो.लतीफ(वय२१) या दोघांकडे देशीकट्टे व जिवंत काडतूस असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली असता दोन्ही आरोपींकडून 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचे 3 देशी बनावटी कट्टे पिस्तूल व 8 हजार रुपये किंमतीचे 8 जिवंत काडतूस असा एकूण 1 लाख 13 हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.

तसेच आरोपी शेख समीर शेख अफसर व मोहोम्मद अवेस मो. लतीफ या दोघांविरुद्ध भादंविच्या कलम 3/25, आर्म अॅक्ट सहकलम 135, मपोकॉ. अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.