केंद्र सरकारच्या विमा योजनेचा लाभ न मिळाल्याने अंगणवााडी कर्मचारी नाराज

प्रातिनिधिक फोटो

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजने साठी अंगणवााडी कर्मचारीही जीवाववर उदार होऊन नागरीकांना आवश्यक सेवा देत आहेत. या योगदाना बद्दल डॉक्टर्स, नर्सेस, आशा यांना जाहिर करण्यात आलेल्या 50 लाखाच्या विमा योजनेचा लाभ त्यांनाहि देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवााडी कृती समितीने केली आहे.

कोरोनाच्या लढय़ावर मात करण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या लढय़ात डॉक्टर्स, नर्सेस, आशा याच्याप्रमाणेच अंगणवााडी कर्मचाऱ्यांनाहि सहभागी करून घेण्यात आले आहे. जीवाववर उदार होऊन या सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस व आशा कर्मचारी यांना शासनाने 50 लाख रूपयांचे विमा संरक्षण देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान अंगणवााडी कर्मचाऱ्यांनाहि जिल्हा आपत्ती व्यवस्थपन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावातील सर्व वाडय़ाचा सर्वे करणे, गावात येणारे, जाणारे, सर्दी, खोकला इत्यादीचे पेशंट याबाबतची माहिती विहित नमुन्यात देण्याचे लेखी आदेश दिले आहेत. सरकारी नोकर नसतानाहि एक सामाजिक बांधिलकी म्हणून स्वच्छता व प्रबोधनाचे काम अंगणवाडी कर्मचारी करत आहेत. मात्र विमा संरक्षण योजनेत त्यांचा समावेश करण्यात आला नसल्याची खंत अंगणवाडी कर्मचारी नेत्या कमलताई परूळेकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच सद्यस्थितीत त्यांना काम करताना मास्क, ग्लोव्हज्, सॅनिटायझर, अॅप्रन इत्यादी कोणत्याहि प्रकारचे साहित्य देण्यात आले नसल्याचा आरोप केला आहे.

शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाहि या योजनेत समाविष्ट करावे यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटना, अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन, अंगणवाडी कर्मचारी संघ, अंगणवाडी कर्मचारी सभा, सेविका व मदतनीस महासंघ, पु.प्रा. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघ, कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन या महाराष्ट्रातील संघटना एकवटल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना या योजनेत तातडीने समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या