
माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँगेसचे नेते अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने 6 नोव्हेंबर पर्यंत ईडी कस्टडी सुनावली आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी देशमुखांवर शंभर कोटी रुपये वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी ‘ईडी’ने देशमुख 12 तासांच्या चौकशीनंतर सोमवारी रात्री अटक केली होती.
ईडीने याप्रकरणी देशमुख यांना पाच वेळा समन्स पाठवले होते, पण ते एकदाही हजर झाले नव्हते. ते नॉटरिचेबल झाले होते. सोमवारी सकाळी ते स्वतःहून ‘ईडी’समोर आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकील इंद्रपाल सिंहसुद्धा होते. अधिकाऱ्यांनी त्यांची तब्बल 12 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली.
Mumbai: Special PMLA court sends former Maharashtra Minister Anil Deshmukh to ED custody till November 6 in connection with extortion and money laundering case pic.twitter.com/F0EFJehJ8W
— ANI (@ANI) November 2, 2021

























































