अंजली दमानिया यांच्याविषयी रेल्वेमध्ये आक्षेपार्ह पत्रकं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | मुंबई

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आलं आहे. अहमदाबाद – यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये दमानिया यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर आणि त्यांचा मोबाईल नंबर लिहिलेली पत्रकं चिटकवली आहेत.

या अगोदरही दमानिया यांच्या विषयी अशाप्रकारची  आक्षेपार्ह पत्रकं ट्रेनमध्ये लावण्यात आली होती. त्यामुळे सध्या दमानिया यांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. दमानिया यांनी या संदर्भात ट्विटरवरून माहिती दिली आहे.