
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या अक्षीक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने गुरूवारी रात्री पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. यापुर्वी ते गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. दरम्यान, डॉ. अभिनव देशमुख यांच्या बदलीचे स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहेत.
अंकित गोयल हे यापुर्वी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. त्यांनी गडचिरोलीतील ग्रामीण भागात राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे गोयल चर्चेत आले होते. त्यांची नियुक्ती आता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुका, जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी त्यांच्यासमोरे आव्हान असणार आहे.

























































