मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या उपसचिव, सहसचिवपदी नियुक्त्या केल्या आहेत.
सदर नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.
उपसचिव- मंदार चव्हाण, उपसचिव- अश्विनी पवार, उपसचिव- रेणुका विचारे, सहसचिव- विक्रम अनिल राठोड, सहसचिव- कल्पेश यादव, सहसचिव – विराज कावडिया, सहसचिव- विशाल केचे.

























































