
अर्जेंटिनामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. लीप फिलर करणं एका महिलेला चांगलच महागात पडलं आहे. लीप फिलरसाठी घेतलेल्या इंजेक्शनचा उलट परिणाम झाल्याने महिलेने ब्युटी क्लिनिकक़डे धाव घेतली आणि पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला आणि ब्युटी क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी महिलेची चांगलीच धुलाई केली. यात कर्मचाऱ्यांनी महिलेला मारहाण करत तिचा मोबाईलही फोडला आहे. घटनेचा व्हिडीओ महिलेच्या बहिणीने रेकॉर्ड केला असून पोलिसात क्लिनिकविरोधात तक्रार देण्यात आली आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, नादिया वालेजुकी असे तिचे नाव आहे. आकर्षक ओठांवर ब्युटी क्लिनिकमध्ये लिप फिलर करायला गेली होती. इथे त्यांनी मेकअपनंतर ओठांवर इंजेक्शन दिले. नादियाच्या म्हणण्यानुसार, ओठांना इंजेक्शन दिल्यानंतर काहीवेळाने तिच्या ओठांना सूज आली आणि वेदना व्हायला लागल्या. एवढेच नाही तर ओठांमधून रक्त यायला लागले.
नादियाने लिप फिलरसाठी 8 हजार रुपये दिले होते. ते फिलर बरोबर न झाल्याने महिलेने ब्युटी पार्लरकडून पैसे परत मागितले. नादियासोबत त्यावेळी तिची बहिणही होती. तिने पैसे परत मागितल्याने ब्युटी पार्लरचे कर्मचारी आणि नादियामध्ये वाद झाला. यामध्ये एका कर्मचाऱ्याने तिचा हात पकडून क्लिनिकच्या बाहेर काढले. पण नादियाने विरोध केल्यानंतर प्रकरण आणखी वाढलं. झटापटीत नागीयाकडून एक फुलदाणी खाली पडून फुटली आणि तुकडे झाले. ते पाहुन क्लिनिकमधील ग्राहक घाबरले. यावेळी नादियाच्या बहिणीने तिच्या मोबाईलमध्ये हे सगळे रेकॉर्ड केले.
नादियाने ब्युटी क्लिनिकवर आरोप केला आहे की, तिला योग्य पद्धतीने इंजेक्शन लावले नाही. त्यामुळे तिच्या ओठांवर त्याचा परिणाम झाला. नादियाच्या म्हणण्यानुसार तिने सांगितलेले प्रोडक्ट त्यांनी वापरले नाही. त्यांनी मला दुसरे प्रोडक्ट वापरत असल्याबाबत माझी परवानगी घेतली नाही आणि जेव्हा जाब विचारला त्यावेळी तिलाच मारहाण केली. 7 ऑक्टोबरला घडलेल्या घटनेची नादीयाने ब्युटी क्लिनीक विरोधात पोलीस तक्रार केली. सध्या या घटनेचा तपास सुरु असून त्या ब्युटी क्लिनीकमधील झटापटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

























































