
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
विश्वविक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्णाच्या पहिल्या सामन्यात फलंदाजीमध्ये फेल झाला आहे. अर्जुनला पहिल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. श्रीलंकेच्या दुलशानच्या गोलंदाजीवर तो एकही धाव न करता बाद झाला. पसिंदू सूर्याबंडाराने झेल घेत त्याला पवेलियनचा रस्ता दाखवला.
याआधी श्रीलंकेविरुद्ध अर्जुन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्णाच्या सामन्यातच बळी मिळण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने पहिलाच बळी टिपण्याची करामत केली होती. कोलंबो येथे सुरू झालेल्या १९ वर्षांखालील श्रीलंका संघाविरुद्धच्या पहिल्या युवा कसोटी सामन्यात १२ चेंडूंत अर्जुनने पहिला बळी टिपला होता. त्याने दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर कामिल मिश्राला एका भन्नाट चेंडूवर पायचित केले होते. परंतु फलंदाजीत तो सफशेल अपयशी ठरला आहे.

























































