
प्रत्येकासाठी प्रवास हा कितीही रोमांचक असला तरी आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी मात्र हा प्रवास अनेकदा विपरीत परिणाम करणारा ठरतो. कारण प्रवासादरम्यान आपले दैनंदिन स्किन केअर रुटीन पाळता येणे शक्य नसते. बदलणारे वातावरणही त्वचेवर परिणाम करू शकते. प्रवासात संपूर्ण ब्युटी किट घेऊन जाण्याचा मोह होत असला तरी ते शक्य होत नाही. त्यामुळे प्रवासात योग्य सौंदर्य उत्पादने कशी निवडाल याबाबत द एस्थेटिक क्लिनिक्सच्या डर्मेटोसर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी दिलेल्या टिप्स…
– अल्कोहोल फ्री क्लिंझरचा वापर करणे. अगदी घाईत असताना कमीत कमी वेळेत योग्य प्रकारे मेकअप काढून टाकतात.
– सनस्क्रीन ः उन्हाळय़ाच्या सुट्टीत सनस्क्रीन आवश्यक आहे. यामुळे तुमच्या त्वचेचे योग्य संरक्षण होते.
– मॉइश्चरायझर ः तेलकट त्वचेसाठी
वॉटर बेस मॉइश्चरायझर निवडा आणि कोरडय़ा त्वचेसाठी ऑइल बेस मॉइश्चरायझर निवडावा.
– मेकअप रीमूव्हर वाइप्स ः ते डिस्पोजेबल असतात आणि जास्त जागादेखील व्यापत नाहीत. रात्रीच्या वेळेस यांचा वापर करणे सोयीस्कर ठरते.
– बॉडी लोशन ः केवळ तुमचा चेहराच नाही, प्रवासादरम्यान तुमचे शरीरही डिहायड्रेट होऊ शकते, त्याकरिता बॉडी लोशनची गरज आहे.
– ड्राय शॅम्पू ः प्रवासादरम्यान नेहमीच केस धुणे शक्य नसते. त्यासाठी ड्राय शॅम्पू हा एक चांगला पर्याय ठरतो. यामुळे केसांना घामामुळे येणारा वास नाहीसा होईल.
– फेस क्लिंझर ः हे त्वचेवरील धूळ, मेकअप काढून टाकते आणि त्वचेवरील छिद्र स्वच्छ करते.
– बीबी क्रीम ः बीबी क्रीम ही प्राइमर, मॉइश्चरायझर, फाऊंडेशन, कन्सिलर म्हणून वापरली जाऊ शकते आणि त्यात काही सनशील्ड गुणधर्मदेखील आहेत.
– लिपस्टिक ः यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, ते ओठांना पोषण देतात आणि ओठांना एक रंगही देतात.
– लिप बाम ः हे ओठांना तडे जाण्यापासून रोखतात. तो तुमच्या किटमध्ये ठेवायला विसरू नका.
– कॉम्पॅक्ट पावडर ः फाऊंडेशन लावणे हे वेळखाऊ काम आहे. कॉम्पॅक्ट पावडर हा त्याला दुसरा सर्वोत्तम पर्याय आहे.
– पर्फ्यूम ः चांगला सुगंध प्रत्येकालाच आकर्षित करतो. त्यामुळे तुमच्यासोबत पर्फ्यूम ठेवायला विसरू नका.
– कन्सिलर स्टिक ः जर तुमचा प्रवास थकवणारा असेल तर तुमच्या प्रवासाच्या गरजांसाठी हायड्रेटिंग, मॅट फिनिश कन्सिलर सोबत बाळगा. हे काळी वर्तुळे आणि निस्तेज त्वचा लपवण्यास आणि त्वचा ताजीतवानी दिसण्यास मदत करू शकते.
तुम्ही त्वचेच्या आजाराने त्रस्त असल्यास त्वचारोग तज्ञांनी शिफारस केलेली त्वचा उत्पादनेदेखील सोबत न्यायला विसरू नका.




























































