
सध्या झी मराठीवरील ‘लोकमान्य’ मालिका खूप लोकप्रिय होत आहे. या मालिकेत गोपाळ गणेश आगरकर यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता म्हणजे अंबर गणपुले… एक प्रॉमिसिंग चेहरा.
अंबर मुळात पुण्याचा. लहानपणी त्याने ‘तू तिथं मी’ या मराङ्गी चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. अभिनयाची त्याला आवड होतीच. पुण्यातील ‘समन्वय’, ‘मुक्तायन’, ‘शोध- पुणे’ अशा विविध ग्रुप्सतर्फे एकांकिका, नाटक यात अंबर कायम सहभागी होत होता. ‘महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी’ येथून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर हॉटेलमध्ये काही वर्षे त्याने नोकरीदेखील केली. सकाळी नोकरी आणि संध्याकाळी आपली अभिनयाची आवड तो जोपासत राहिला. मग त्याने स्वतःचा केटरिंगचा व्यवसायदेखील सुरू केला. ‘फुलराणी’ या मालिकेत त्याची भूमिका होती.
अंबरला एक नवी ओळख मिळाली ती ‘रंग माझा वेगळा’ मालिकेमुळे. त्यात त्याने आदित्य इनामदार ही व्यक्तिरेखा साकारली. या भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला, त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं. या मालिकेच्या नऊशे भागांपर्यंत त्याने काम केले. त्यानंतर लेखक निरंजन परांडकर याने अंबरचे नाव ‘लोकमान्य’ मालिकेसाठी सुचवलं. मग त्याने ऑडिशन दिली आणि गोपाळ गणेश आगरकर या महत्त्वाच्या व्यक्तिरेखेसाठी त्याची निवड झाली. आगरकरांची व्यक्तिरेखा साकारण्यासाङ्गी अंबरला केस कापावे लागणार होते, पण भूमिकेचा गेटअप वास्तव दिसण्यासाठी ते गरजेचं होतं.
अंबर म्हणतो, ‘‘आगरकरांची भूमिका करणं हे माझ्यासाठी एक आव्हान होतं. आगरकरांबद्दल असलेलं ‘गोपाळ गणेश आगरकर-व्यक्ती आणि विचार’ हे खांडेकरांचं पुस्तक मी वाचलं. शिवाय ‘लोकमान्य’ मालिकेची क्रिएटिव्ह टीम, अक्षय पाटील, लेखक-दिग्दर्शक यांच्याशी सातत्याने होणाऱया चर्चेतून हळूहळू आगरकरांचे व्यक्तिमत्त्व मला उलगडत गेले. आगरकरांची सुधारक विचारसरणी, त्यांचे स्त्राr शिक्षणासंदर्भातले विचार, औद्योगिक क्रांतीबद्दलचे विचार हे सर्व आजच्या काळालासुद्धा कसे लागू पडतात हे समजलं. ज्याप्रमाणे टिळक आणि आगरकर यांची मैत्री वाढत गेली, तशी माझी आणि लोकमान्यांची भूमिका करणारा क्षितीश दाते, आमची मैत्रीसुद्धा वाढत गेली.’’
– गणेश आचवल



























































