>> मलिका अमरशेख
आपण सर्वचजण वर्षाचा शेवटचा दिवस खूप उत्साहानं साजरा करतो. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं तेवढय़ाच जोमात स्वागत करतो, नवनवीन संकल्प करतो, अर्थात ते तितक्याच वेगात ते बारगळतातही! यात ‘आपण आपल्याला थोडे मार्क दिलेच पाहिजेत! जगभरात त्या दिवशी वा नंतरही जराही नाउमेद होत नाहीत! खूप काही घडतबिघडत असतं. पण पहा ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायानं प्रत्येक वर्षी संकट, आघात, वादळ सोसून आपण उभेच राहतो!
वर्ष संपायला आलंय… हां हां म्हणता वर्ष म्हातारं झालं… नवीन वर्ष उंबरठय़ाबाहेर रांगत येतंय. काय असेल त्याच्या बालमुठीत? संकल्प-स्वप्न की आणखी बऱयावाईट घटना सटवाईनं लिहून ठेवल्या असतील?
आपण सर्वचजण वर्षाचा शेवटचा दिवस खूप उत्साहानं साजरा करतो. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं तेवढय़ाच जोमात स्वागत करतो, नवनवीन संकल्प करतो, अर्थात ते तितक्याच वेगात ते बारगळतातही! यात ‘आपण आपल्याला थोडे मार्क दिलेच पाहिजेत! जगभरात त्या दिवशी वा नंतरही जराही नाउमेद होत नाहीत! खूप काही घडतबिघडत असतं. पण पहा ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायानं प्रत्येक वर्षी संकट, आघात, वादळ सोसून आपण उभेच राहतो! मग त्सुनामी, कोरोना असो अस्मानी व सुलतानी सर्वच संकटांना सामोरं जाऊन आपण जगण्याचा उत्सव साजरा करतो!
कारण माहीत असतं. चिवट जिवंटपणे आपण उभं राहिलं तरच जगू शकतो. वर्ष संपत आपण पण संपत जाणार असतो. जोवर आहोत तोवर छान जगून घ्यायचं. आयुष्याचा उत्सव रोज साजरा करायचा… नवा दिवस उजाडतो तो आपली नवा जन्म असल्यागत चैतन्यानं आनंदानं जगून घ्यायचा.
तसं पाहिलं तर समजा अगदी प्राचीन काळात आपण स्वतःला ठेवून पहा थोडावेळ… काळ.. वेळ.. कॅलेंडर महिना दिवस काहीच नव्हतं तेव्हा सगळे दिवस सारखेच! रोज शिकार करायला बाहेर पडायचं. दगडाची हत्यारं घेऊन अन् परत येताना काही वजा काही इजा झालेले. वीज, पाऊस हे अद्भुत चमत्कारागत वाटणार. हळूहळू ऋतू कळू लागले.
आता तर आपण खूप पुढे आलोत. पण तरीही निसर्गापेक्षा नाही! प्रलयंकारी वादळं, महामारी, दुष्काळ ओला-सुका. यापुढं आपण काहीच नाही. हवेच्या पातळय़ा जरा जरी वरखाली तीक्र किंवा कमी झाल्या तरी आपले श्वास कासावीस होतात.
प्रदूषणाची पातळी तपासतात लोक. जी आपल्याच चुकांमुळे वाढलेली असते.
फक्त आपल्या टीचभर घरातल्या चिमुकल्या बाल्कनीत तुळस लावल्याने प्रदूषण कमी होणार नसतं. सिमेंटी जंगल वाढत चाललंय. गिरण्यांची धुरांडी कमी काय नष्टच झाली, पण गाडय़ा-फ्रीजमधून आणि प्रचंड प्लॅस्टिक व रासायनिक वायू प्रमाणाबाहेर वाढून प्रदूषण वाढलंय अन् यासाठी प्रत्येक शहरात प्रत्येक घर, इमारती, सोसायटय़ा, रस्ते यामध्ये झाडांची जंगलं उभी करायला हवीत.
प्रत्येक घरटी फक्त एकच गाडी असावी असं बंधन घालायला हवं. आता हेच पहा मुंबईत मेट्रो-मोनोरेलचे मोठं जाळं तयार होऊ लागलंय. त्यासाठी खणाखणी, अगडबंब मशिनरी अन् अर्थात अमाप अर्थव्यवस्था. पण ते ठीक हो, पण त्यामुळे लोक आपापल्या गाडय़ा विकून ट्रेननं थोडंच जाणारेत? उलट मेट्रोच्या पसाऱयामुळे पदपथ नष्ट तर झालेच, पण खालील रस्ते अरुंद होऊन ट्रफिक जामची परिस्थिती अधिक बिकट झाली. गंभीर जखमी, आजारी माणूस, गरोदर स्त्र्ाया या रुग्णालयात कशा जाणार? जर ऍम्ब्युलन्सला वाट मिळत नसेल तर?
मुलांना खेळायल मैदान नाहीत, स्मार्टफोनचं वेड लागलेलं ज्याला त्याला. लोक प्रेमात पडायच्याआधी फोनमध्ये अडकतात. आपण विकासाच्या वाटेकडे जाताना भकास होऊन जात नाही ना याचं भान आधी ठेवायला हवं.. यावरच एक माझी कविता देण्याचा मोह आवरत नाहीय.
‘‘काय म्हणतोयस् तू?
लव्ह मी?
टेक्स्ट कर ना..
पारिजातक फुललाय?
अपलोड कर ना ?
गार । गा । र वारे न् पाऊस झिमझिम् ?
ओह हो…
फोटो पाठव ना?’
तर असं एकंदरीत कुणालाच वाचायला बोलायला भेटायला वेळच नाही. माणसांना भेटायला नाही, शब्दांना न निसर्गालाच काय स्वतःला भेटायला वेळ नाही! कदाचित स्वतःला भेटताना त्यातला शून्याचा चेहरा, प्रश्नांचे चेहरे दात विचकणारे याला ते घाबरत असतील! पण मुखवटे उतरवायलाच हवेत कधी ना कधीतरी… विदूषक पण आपला प्रवेश संपल्यावर मुखवटा उतरवून रंग पुसतोच ना!






























































