स्टॉक मार्केटमध्ये महिलांना संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रवीण धोपट

स्टॉक मार्केट हे असेच एक क्षेत्र आहे ज्यात स्त्रियांनी आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले आहे. त्यातल्या काही करीअरच्या संधी खालीलप्रमाणे…

स्टॉक ट्रेडर ःकोणतीही स्त्राr जिला बेसिक आकडेवारी कळते, नफा नुकसान यातला फरक कळतो, तिला काही जुजबी ज्ञान घेऊन स्टॉक ट्रेडिंग करता येऊ शकते. घरबसल्या लॅपटॉप किंवा मोबाइल ऍपवरून ट्रेडिंग करणे सहज शक्य आहे. इंट्राडे, स्विंग किंवा लाँग टर्म ट्रेडिंगच्या अनेक संधी मार्केटमध्ये उपलब्ध असतात.

इन्व्हेस्टमेंट अनॅलिस्ट ः काही गुंतवणूकदारांना एखाद्या स्टॉकचे अनॅलिसिस करून हवे असते. फायनांशिअल डेटा आणि इतर संशोधन करून इन्व्हेस्टमेंटची योग्य संधी कधी आहे, हे सांगणे हे स्वतंत्र करीअर आहे. असेट मॅनेजमेंट कंपन्या, हेज फंड किंवा इन्व्हेस्टमेंट बँक अशा प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, तिथे स्त्रियांसाठी करीअरच्या संधी आहेत.

पोर्टफोलिओ मॅनेजर ः एखाद्या क्लायंटसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट कंपनीसाठी पोर्टफोलिओ मॅनेज करणे हे स्वतंत्र करीअर आहे. काही क्लायंट किंवा कंपन्या आपली इन्व्हेस्टमेंट एखाद्या कंपनीकडे सुपूर्द करतात. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कंपनी त्या क्लायंट किंवा कंपन्यांचा फंड मॅनेज करतात. अशा कंपन्यांमध्ये वेगवेगळय़ा स्ट्रटेजी वापरून आणि संशोधन करून स्टॉक सिलेक्ट करणाऱया मॅनेजरसाठी करDिारच्या संधी असतात.

फायनांशिअल ऍडव्हायझर ः क्लायंटला त्याचा फायनांशिअल ध्येय मिळवून देण्यासाठी काही फायनांशिअल ऍडव्हायझर मदत करीत असतात. यामध्ये फायनांशिअल प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा रिस्क मॅनेजमेंट अशा सर्व्हिसेस असतात.

स्टॉक ब्रोकर ः क्लायंटच्या वतीने स्टॉक खरेदी-विक्रीची सुविधा देता येऊ शकते. यामध्ये सबब्रोकरचा रोल महत्त्वाचा असतो. एखादी स्त्राr एखाद्या ब्रोकरेज फर्मशी जोडली जाऊन किंवा स्वतंत्रपणे काम करू शकते.

संशोधन आणि विश्लेषण ः स्टॉक ट्रेडिंगमध्ये संशोधन आणि विश्लेषण याला खूप महत्त्व आहे. एखादा संशोधक एखाद्या विशिष्ट इंडस्ट्री किंवा सेक्टरमध्ये आपले संशोधन करू शकतो आणि त्यानुसार सल्ले देऊ शकतो. इन्स्टिटय़ूशनल गुंतवणूकदार किंवा असेट मॅनेजमेंट फर्मसाठी अशा संसोधकांची आवश्यकता(लेखक दीपंकर फिनकॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत) असते.