
>> रश्मी वारंग
लहानपणीच्या आठवणींना जोडून ठेवणारे अनेक धागे असतात. त्यातला साखरलेला गोडमगोड गुलाबी धागा म्हणजे कॉटन पँडी ऊर्फ बुढीया के बाल ऊर्फ म्हातारीचे केस. लहानपणीचं हे गोडगुलाबी अप्रुप जन्माला कसं आलं त्याची ही गोष्ट.
1897 म्हणजे साधारण 126 वर्षांपूर्वी अमेरिकन दंतचिकित्सक विल्यम मॉरिसन आणि गोड पदार्थांचा विव्रेता
जॉन सी. व्हार्टन यांनी एकत्रितपणे एक असं यंत्र बनवलं, ज्यातून साखरेचा रेशीमधागा तयार केला जाऊ लागला. यंत्र तयार झालं तरी लोकांपर्यंत ते पोहोचण्यासाठी तब्बल 7 वर्षांचा काळ जावा लागला. 1904 मध्ये ‘सेंट लुईस वर्ल्ड फेअर’ ही प्रचंड जत्रा भरणार होती. आपलं यंत्र लोकांसमोर आणण्याची मॉरिसन आणि व्हार्टन यांना ही उत्तम संधी वाटली. ही जत्रा म्हणजे शतकातील मोठा सोहळाच होता. जवळपास 20 दशलक्ष लोकांनी या जत्रेला भेट दिली. तिथं हा गोड चमत्कार लोकांनी अनुभवला आणि ते वेडेच झाले. मॉरिसन आणि व्हार्टन यांनी आपल्या या प्रयोगाला नाव दिलं होतं ‘फेअरी फ्लॉस’ अर्थात, पऱयांचा रेशीम धागा. लोकांना हा गोड पदार्थ प्रचंड आवडला. हा ‘फेअरी फ्लॉस’
बॉक्सबंद करून विकण्यासाठी आणला होता आणि त्या जत्रेत 68 हजार बॉक्स विकले गेले. दोघांनी त्यातून जवळपास 17 हजार डॉलर्स कमावले, जे त्या काळाचा विचार करता प्रचंड होते. मॉरिसन आणि व्हार्टन यांना आपल्या शोधाचं महत्त्व कळलं होतं. त्या यंत्राचे पेटंट त्यांनी मिळवले. त्यामुळे पहिली 25 वर्षे हे यंत्र विकण्याचा हक्क फक्त आणि फक्त मॉरिसन आणि व्हार्टनकडेच राहिला.
त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांनी या यंत्रात बदल करून ते विक्रीसाठी उपलब्ध केलं आणि ही कॉटन पँडी जगभर पसरली. सुरुवातीला ‘फेअरी फ्लॉस’ असणारा हा गोड पदार्थ जोसेफ लॉक्साक्स याला कापसासारखा भासला आणि त्याने या पदार्थाला
कॉटन पँडी म्हणायला सुरुवात केली, जे नाव आज जगभरात प्रसिद्ध आहे.
जगभरातील बच्चे पंपनीत विशेष प्रिय ही कॉटन पँडी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. आपल्याकडे तिला बुढीया के बाल अर्थात, म्हातारीचे केस किंवा कापूस म्हणतात. फ्रेंच मंडळी तिला डॅडीज बिअर्ड (बाबांची दाढी), चिनी मंडळी ड्रगन बिअर्ड (ड्रगनची दाढी), नेदरलँडमध्ये शुगर स्पायडर (साखरेचा कोळी) म्हणतात.
लहानपणी भांडे घेऊन त्यात चमचा चमचा साखर ओतत नंतर तो रेशमासारखा गुलाबीसर कापूस तयार करणारा कापूस विव्रेता एखाद्या जादूगारापेक्षा कमी नव्हता. रस्त्यावर स्वस्तात मिळणारे हे गुलाबी बुढीया के बाल आता मॉलमध्ये वेगवेगळय़ा रंगात, आकारात भरपूर पैसे मोजून मिळतात. तसं पाहिलं तर चवीत फारसा फरक नसतो. फरक करायचाच तर जागेचा आणि स्वच्छतेचा.
अमेरिकेत 7 डिसेंबर ‘नॅशनल कॉटन पँडी दिवस’ म्हणून साजरा होतो. याच दिवशी पर्ल हार्बरवर हल्ला झाला होता. कदाचित त्या भयंकर दिवसाची तीव्रता कमी करण्यासाठी हा दिवस कॉटन पँडी दिवस म्हणून निवडला गेला असेल.
लहानपणी आपण आशाळभुतासारखे त्या कापूस विकणाऱयासमोर उभे असायचो. बघता बघता लाकडी काठीवर गुलाबी काwतुक फुलत जायचं. एवढं सगळं तोंडात कसं कोंबायचं याचा विचार करता करता खायला सुरुवात व्हायची आणि बघता बघता तोंड, नाक, गाल साखरेच्या चिकटगोडपणाने माखून जायचे. एक वेगळंच विश्व! एक वेगळीच गोड दुनियादारी!


























































