लेख – विस्तारवादी चीनमुळे जगाचा विकास थांबला

>> रमेश कृष्णराव लांजेवार

आज जगात लोकसंख्या, पर्यावरण, ग्लोबल वार्ंमग इत्यादी गंभीर समस्या आहेत. मात्र चीनच्या युद्धखोर चालीमुळे या समस्या बाजूला सारून फक्त युद्धसामग्री खरेदी-विक्रीवर जास्तीत जास्त भर देत आहे. आज चीन स्वतःचे पाप दुसऱयाच्या माथी मारून जगाला विनाशाच्या खाईत लोटत आहे. सध्याच्या परिस्थितीत जगातील विकासाची कामे खोळंबलेली आहेत. अशी परिस्थिती किती दिवस राहील हे सांगणे कठीण आहे. एक वेळ होती की, विकासासाठी प्रत्येक देशात स्पर्धा व्हायची; परंतु अचानक परिस्थिती बदलली व संपूर्ण जगात संघर्षाची भूमिका निर्माण झाली.

संपूर्ण जग चीनला कोसत आहे, तरीही त्यांची विस्तारवादी नीती सुरूच आहे. तथापि हिंदुस्थानने चीनवर वेळीच लगाम कसल्याने चीनची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे हिंदुस्थान-चीनमध्ये तणातणी सुरूच आहे. चीनचे डोके ठिकाणावर आलेले नाही.

आज जग कोविड-19 ने त्रस्त आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे. कोटय़ावधी बेरोजगार झाले. अनेक मोठय़ा कंपन्या बुडाल्या. यामुळे जगात उपासमारीसारखे कठीण प्रश्न उभे आहेत. याचे मुख्य कारण फक्त चीन आहे. चीनच्या कोविड-19 महामारीने जगातील अनेक देशांनी चीनसोबत व्यापारी व इतर संबंध तोडले आहेत. त्यामुळे जगातील अनेक देश हिंदुस्थानात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे चीन सध्याच्या परिस्थितीत संतापला आहे. त्यामुळे चीनचे पहिले टार्गेट अमेरिका नसून हिंदुस्थान आहे.

चीनने विस्तारवादाची पुनरावृत्ती करून हिंदुस्थानच्या शेजारील देशांना लालूच दाखवून आपले एअरबेस व सैन्यतळ उभारण्याची तयारी सुरू केली आहे. पेंटागॉनच्या अहवालानुसार पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिरात, केनिया, सेशल्स, टांझानिया, अंगोलिया आणि कझाकिस्तानमध्ये लष्करी तळ व एअरबेस निर्माण करण्याच्या प्रकल्पावर चीन काम करीत आहे. पाकिस्तान व नेपाळ तर चीनला विकले गेले आहेत ही बाब जगजाहीर आहे; परंतु सीमेलगतचे काही देश आपला विश्वासघातसुद्धा करू शकतात. त्यामुळे हिंदुस्थाननेही आपली संपूर्ण ताकद एलओसी व एलएसीवर लावली आहे. हिंदुस्थानने ज्याप्रमाणे चीनला शिंगावर घेण्याची भूमिका अंगिकारली आहे, त्याप्रमाणे तैवाननेसुद्धा चीनला खुले आव्हान दिले आहे. असेही सांगण्यात येते की, चीनचे सुखोई-35 विमान तैवानने पाडले. यावरून स्पष्ट होते की, चीनच्या विरुद्ध अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, नाटो देश, तैवान, हिंदुस्थान एकजूट झाले आहेत. चीनचे निंदाजनक कृत्य पाहता अमेरिकेसह नाटो सैन्य ‘चायना सी’मध्ये सज्ज आहे. जगातील अनेक देशांनी चीनची आर्थिक नाकेबंदीसुद्धा केली आहे. त्यामुळे आता चीनची मुजोरी जास्त दिवस चालणार नाही.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही महिन्यांपासून हिंदुस्थान-चीन यांच्यात तणाव आहे. चीनच्या हेकेखोरपणामुळे संघर्ष भडकण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. चीनच्या वागण्यावरून असे वाटते की, सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून ती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. मुळात हिंदुस्थानची जगातील वाढती प्रतिष्ठा पाहता चीन अस्वस्थ झाला आहे. याकरिता हिंदुस्थानलगतच्या देशांमध्ये विष पेरण्याचे काम चीन करीत आहे. ही बाब आता सिद्ध झाली आहे की, चीन आता जगाच्या नजरेत विषारी देश बनला आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःहून धोका पत्करण्यासारखे होईल. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची विस्तारवादी नीती पाहता हिटलरच्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करीत असल्याचे दिसून येते. परंतु अशा विस्तारवाद्यांचा अनेक बाबतीत अंत होणे अटळ असते. लडाखच्या तणावाला चीन हिंदुस्थानला दोष देत आहे. पुन्हा एक इंच जमीनही सोडणार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य चिनी संरक्षणमंत्री वेई फेंगही यांनी केले आहे. म्हणजेच उलटा चोर कोतवाल को डाटे. परंतु आजच्या संघर्षमय परिस्थितीत हिंदुस्थान चीनला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे ही बाब चीनने लक्षात ठेवली पाहिजे. आज उत्तर कोरिया व चीन जगाला विनाशाकडे नेत आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन युरोपियन देशांना व दक्षिण कोरियाला अनेक परमाणू बॉम्बचे परीक्षण करून धमकी देत असतो, तर चीन विस्तारवादाची भूमिका स्वीकारून आशिया खंडात आपले वर्चस्व प्रस्थापित करून जगातील अनेक देशांशी दुष्मनी घेत आहे. या देशांना विनाकारण युद्धासाठी भडकवत आहे. उत्तर कोरिया आणि चीनच्या या संघर्षमय नीतीमुळे आज जगातील बहुतांश देश फक्त युद्धसामग्री, दारूगोळा, परमाणु परीक्षण यावर जास्तीत जास्त भर देताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत तिसरे महायुद्धच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज जगात लोकसंख्या, पर्यावरण, ग्लोबल वार्ंमग इत्यादी गंभीर समस्या आहेत. मात्र चीनच्या युद्धखोर चालीमुळे या समस्या बाजूला सारून फक्त युद्धसामग्री खरेदी-विक्रीवर जास्तीत जास्त भर देत आहे. एकीकडे कोरोना महामारीने उग्र रूप धारण केले आहे. व्हॅक्सिन किंवा औषधी बाजारात वर्षाअखेर तरी येण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत महामारी व युद्धजन्य परिस्थिती जगाला विनाशाकडे नेत आहे. हे कुठेतरी रोखले पाहिजे. आज चीन स्वतःचे पाप दुसऱयाच्या माथी मारून जगाला विनाशाच्या खाईत लोटत आहे. सध्याच्या परिस्थितीत जगातील विकासाची कामे खोळंबलेली आहेत. अशी परिस्थिती किती दिवस राहील हे सांगणे कठीण आहे. एक वेळ होती की, विकासासाठी प्रत्येक देशात स्पर्धा व्हायची; परंतु अचानक परिस्थिती बदलली व संपूर्ण जगात संघर्षाची भूमिका निर्माण झाली. मानवजातीला जगायचे असेल व पृथ्वीला वाचवायचे असेल तर हा संघर्ष थांबलाच पाहिजे व त्याची सुरुवात चीनपासून व्हायला हवी.

कोरोना महामारी चीनच्या वुहानमधून आली आणि संपूर्ण जगात पसरली. त्यामुळे विकास खुंटला व विनाश वाढल्याचे दिसून येते. याला कारणीभूत चीन आहे. दुसरीकडे हिंदुस्थान-चीन सीमेवर जाणीवपूर्वक चीनकडून तणाव वाढवला जात आहे. हिंदुस्थानच्या शेजारचे देश चीनच्या मदतीने हिंदुस्थानविरुद्ध मोठे षड्यंत्र रचण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे हिंदुस्थानने सावध राहण्याची गरज आहे. कारण चीनसोबत तणाव कमी न होता वाढतच आहे. हिंदुस्थानने चीनला टक्कर देण्यासाठी हायपरसॉनिक मिसाईलचे सफल परीक्षण केले आहे. यामुळे जगातील हायपरसॉनिक मिसाईलच्या टेक्नॉलॉजीमध्ये हिंदुस्थान चौथ्या नंबरचा देश बनला आहे. म्हणजेच हिंदुस्थानने चीनला जशास तसे उत्तर देण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. हिंदुस्थान आताही शांती प्रस्थापित व्हावी या उद्देशाने काम करीत आहे, परंतु चीनची नियतीत खोटी आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. तो ठेवू नये, कारण चीनने जगालाच विनाशाच्या खाईत ढकलले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या