
>> नीती मेहेंदळे
चालुक्य काळात धर्मापुरीचा इंद्रनगरी असाही उल्लेख केला जात असे. पुढे हे नगर राष्ट्रकुटांची राजधानी असलेले प्रसिद्ध बाजारपेठ, धार्मिक व सांस्कृतिक केंद्र, वैभवशाली नगर म्हणून प्रसिद्ध होते. धर्मापुरीत चालुक्य कालीन काही शिलालेख मिळालेले आहेत. यांत धर्मापुरीची संपूर्ण माहिती आहे. धर्मापुरीचा प्राचीन गढीवजा भुईकोट उद्ध्वस्त तटबंदीचे अवशेष घेऊन वस्तीतच आहे हे अजून एक नगरविशेष. कल्याणी चालुक्यांच्या काळात या ठिकाणी अनेक शिवमंदिरे होती.
महाराष्ट्रातले मंदिर स्थापत्य अभ्यासताना मराठवाडा विभाग वगळून चालतच नाही. कारण मराठवाडा हा मंदिर स्थापत्याच्या अभूतपूर्व आविष्कारांसाठी प्रसिद्धच आहे.
मराठवाडय़ात असंच एक शिल्पवैभव दडलंय. बीड जिह्यात आंबेजोगाईपासून जेमतेम तीस किमीच्या टापूत धर्मापुरी नावाचे प्राचीन वारसा सांगणारे लहानसे गाव वसलेले आहे. या गावाला प्राचीन शिवमंदिरांचं सान्निध्य लाभलेलं आहे हे त्याचं वैशिष्टय़. चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली असे सांगितले जाते. चालुक्य काळात तिचा इंद्रनगरी असाही उल्लेख केला जात असे. पुढे हे नगर राष्ट्रकुटांची राजधानी असलेले प्रसिद्ध बाजारपेठ, धार्मिक व सांस्कृतिक पेंद्र, वैभवशाली नगर म्हणून प्रसिद्ध होते. धर्मापुरीत चालुक्य कालीन काही शिलालेख मिळालेले आहेत. यांत धर्मापुरीची संपूर्ण माहिती आहे. धर्मापुरीचा प्राचीन गढीवजा भुईकोट उद्ध्वस्त तटबंदीचे अवशेष घेऊन वस्तीतच आहे हे अजून एक नगरविशेष. कल्याणी चालुक्यांच्या काळात या ठिकाणी अनेक शिवमंदिरे होती.
गावाच्या पूर्वेला खडकाळ भाग आहे. या खडकाळ भागी शेतात एक चालुक्य काळातलं कलेचा अफाट नमुना असलेलं 11- 12 व्या शतकात बांधलेलं केदारेश्वर शिवालय तग धरून आहे. हे केदारेश्वर मंदिर गावापासून अगदी जवळ असून याचा महामंडप अत्यंत विस्तीर्ण आणि भव्य आहे.
केदारेश्वर देवालयाचे खरं कलावैभव बाह्यभिंतीवरील शिल्पकामात दिसतं. या बाह्यभिंती तारकाकृती आकाराच्या असून त्यांचं जोतं खूपच उंच आहे. या भिंतीच्या कटीप्रदेशावर मानवी रूपातल्या जवळजवळ 68 अतिशय सुंदर मूर्ती कमालीच्या लयबध्दतेने कोरलेल्या आहेत. प्रत्येक शिल्पात जिवंतपणा, गतिमानता, कलाविष्कार आहे. यात मिथुनशिल्पे व इतर शिल्पे आहेत, जी शैव, वैष्णव व काही शक्ती संप्रदायातलीही आहेत. गजथर व इतर शिल्पपट्ट जमिनीला समांतर दिसतात. काली, ब्रह्मा, नरसिंह, वराह, विष्णू, शिव, सुरसुंदरी इत्यादी मूर्ती मंदिराच्या अधिष्ठानावर सुंदररीत्या कोरलेल्या दिसतात.
बाह्य भागावर असलेल्या तीन देवकोष्ठांमधे उत्तरेला केशव, वासुदेव आणि हिरण्यकश्यपूचा वध करणारी नरसिंह मूर्ती कोरली आहे.
शिवाय देवळाच्या मंडोवरावरील शिल्पावळीत विष्णू देवतेच्या 24 मूर्तीप्रकारातील सुरेख प्रतिमा आढळतात. नृसिंह व वामन अवताराच्या शिल्पांच्या रूपाने अवतार शिल्पांचा मोहक घडणावळ इथे दिसते. वामन अवताराचे शिल्प असलेली प्रचंड शिळा या देवालयाच्या भिंतीमधून कोसळून बाजूला जमिनीवरच दुर्लक्षित पडलेली दिसते. संहार श्रीगणेशाची एक मूर्ती तसेच लक्ष्मी-विष्णुची आलिंगन अवस्थेतील मूर्ती, संहाररूपातील विष्णू, ब्रह्मा, चामुंडा व भैरवाच्या मूर्तीही आहेत.
केदारेश्वराच्या मंदिरात काही विलक्षण उल्लेखनीय शिल्पं आहेत. पैकी एक वेगळीच नरसिंह मूर्ती आहे. डाव्या हातात वर चक्र व उजव्या हातात खाली अभयमुद्रा, अक्राळविक्राळ मुख, उंचावलेल्या भिवया, पण हिरण्यकश्यपूचा वध मात्र शिल्पांकित नाही. मुद्रा उग्र पण हिंस्त्र नाही, संयत दिसते. हा हिंदुस्थानातल्या दुर्मिळ शिल्पाविष्कारांपैकी एक असावा.
दुसरे आहे ते पत्रलेखिकेचे. धर्मापुरी येथील वादिका, अप्सरा, सुरसुंदरींची सर्वच शिल्पं अतिशय देखणी झाली आहेत. यात खास लक्षवेधक आहे ते पत्रलेखन करणाऱया अप्सरेचं. त्रिभंगात उभ्या तिचा कमनीय डौलदार बांधा तपशिलासह कोरलेला दिसतो. उजवा पाय किंचित उचलून डाव्या पायावर टेकवला आहे. मान वर उंचावून हात वर करून बोटांनी लिहीत आहे. पाचव्या ओळीशी तिथे अस्तित्वात असलेला शिलालेख खोळंबला आहे व हे शिल्पकलेचे उत्तम निदर्शक आहे. बाराव्या शतकात स्त्रिया लिहीत होत्या याचीही हे शिल्पांकन नोंद घेते.
दंतवक्रवध या कथेचे मंदिराच्या मंडोवरावर अजून एक महत्त्वाचे व दुर्मिळ प्रकारचे शिल्पांकन केलेले दिसते. या शिल्पामधली दंतवक्रवधाची कथा महाभारतामध्ये विस्ताराने दिली आहे. थोडक्यात सांगायचे तर जरासंध व शिशुपाल वधाचा बदला म्हणून द्वारकेवर चालून आलेल्या शाल्य राजाच्या सैन्यात दंतवक्र हा शिशुपालाचा खास मित्र होता. त्याच्या हल्ल्याला उत्तर म्हणून श्रीकृष्णाने काwमुदकी गदेने त्याचा छाती पह्डून वध केला. या कथनशिल्पामध्ये श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार असल्याने तो चर्तुभुज दाखवला आहे. खालच्या डाव्या हातात गदा असून ती दंतवक्राचे वक्षस्थळ भेदून आरपार झाल्याचे दाखवले आहे. श्रीकृष्णाच्या चेहऱयावर उग्र भाव असल्याने यास संहारमूर्ती असे म्हटले जाते. हे अजून एक दुर्मिळ शिल्पांपैकी आहे. धर्मापुरीच्या शिल्पकलेवर होयसळा शिल्पशैलीचा प्रभाव दिसतो. उंच पीठ, त्यावर आडवे समांतर पट्ट, बारीकसारीक कोरीव काम, शिल्पप्रतीपं, ही होयसळा शैलीची वैशिष्टय़ हळूहळू येथे स्वीकारलेली दिसतात.





























































