मुद्दा : पाऊस जिरवणाऱ्या जमिनी नष्ट

17

>>ज्ञानेश्वर भि. गावडे

हवामानातील बदलाचा विपरीत परिणाम पाऊसपाण्यावरच नाही तर अन्नधान्याच्या कसावरही (पोषण मूल्यावर) झालेला आहे. आजही लोकांच्या चर्चेत पूर्वीच्या कसदार अन्नधानाच्या विषय हमखास निघतो.

भारतीय हवामान विभागात हवामानाचा अंदाज विभागाच्या खात्याचे प्रमुख डॉ. डी. एस. पै यांनी म्हटले आहे की, नुकताच केरळमध्ये झालेला अभूतपूर्व जलप्रलय पर्जन्यसृष्टीत नवा नाही. ईशान्येकडील राज्यातही केरळसदृश जलप्रलय होतच असतो तसा पश्चिम घाटालगत (महाराष्ट्र, कर्नाटक) अवकाळी जलप्रलयाची शक्यता नाकारता येत नाही.

आपल्या देशातील बहुसंख्य लोकवस्ती देशाच्या सखल भागात राहते कारण त्यामुळे जमिनीत जिरलेल्या भूजल पातळीचा लाभ घेता येतो. ही भूजल पातळी कायम राहावी म्हणून पावसाचे पाणी जिरवणाऱ्या मोकळय़ा जमिनी आवश्यक असतात. विकासाच्या व समृद्धीच्या नावावर नवनवे रस्ते आले, त्याला जोडून निवासी व अनिवासी बांधकामे आली. दोन शहरांना जोडणारे लहानमोठे रस्त्याचे जाळे पसरले. परिणामी पावसाचे पाणी झेलणारी व जिरवणारी जमीन, पाणी शोषून घेण्याची क्षमता, क्षेत्र कमी झाले. परिणामी प्रवणग्रस्त जमिनीखालची पाण्याची पातळी कमी कमी होत गेली. केरळमध्येही असेच झाले आणि पश्चिम घाटक्षेत्रातही असेच घडत जाणार म्हणून त्याचा फटका. अवकाळी पावसाळय़ाचे धोके संभवतात. त्यामुळे येथून पुढे थोडासाही पाऊस आला तर पूरस्थिती तयार होते. पाण्याची साठवण असलेली तळी, सरोवर, नद्या, नाले लवकर वाहू लागतात. वरचा पाऊस त्यात आला की, जलप्रलय झालेला दिसतो. केरळची जलप्रलय स्थिती हे सर्व सांगून गेलेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या