बोधचित्रकला आणि सृजनात्मक चित्रनिर्मिती करणारा चित्रकार हरपला; ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोधचित्रकला आणि सृजनात्मक चित्रनिर्मिती अशा चित्रकलेच्या विविध अंगांना स्पर्श करणारे, रंग-रेषांचा चतुरस्र कलाकार ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे शनिवारी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

काही दिवसांपासून ते पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या मॉडेल कॉलनीतील निवासस्थानी ठेवण्यात आले. कलाविश्वातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यावर वैपुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने चित्रकलेच्या क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. ‘बोधचित्रकार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रवी परांजपे यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1935 रोजी बेळगाव येथे झाला. त्यांच्या  घरातच कलेचा वारसा होता.  त्यांनी चित्रकलेचे उच्च शिक्षण बेळगाव येथील के. बी. कुलकर्णी यांच्या चित्रमंदिर येथे आणि पुढे मुंबई येथे जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून पूर्ण केले. 1960च्या दशकापासून उपयोजित बोधचित्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या स्वतंत्र चित्रशैलीचा ठसा त्यांनी उमटविला. रवी परांजपे यांच्या करीअरची सुरुवात ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील नोकरीने झाली. नंतर त्यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र्ा या क्षेत्रांत हिंदुस्थानभर काम केले. दैनिक ‘सामना’च्या दिवाळी अंकांचे मुखपृष्ठ अनेक वर्षे रवी परांजपे यांनी साकारले. अनेक जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून परांजपे यांनी संशोधनपर लेखन केले.

परांजपे यांना ‘अमेरिकन आर्टिस्ट्स अॅपॅडमी’तर्फे जाहीर झालेला जागतिक पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा आवाका स्पष्ट करतो. फेब्रुवारीमध्ये त्यांना ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे ‘रूपधर’ हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठsचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांना  ‘कम्युनिकेशन आर्ट्स गिल्ड’तर्फे ‘पॅग हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार दिला. 1996 साली त्यांना ‘दयावती मोदी फाऊंडेशन आर्ट कल्चर अॅण्ड एज्युकेशन’तर्फे ‘दयावती मोदी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या निधनाने चित्रकलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक ठळक करणारा मनस्वी कलाकार हरपला आहे. चित्रकलेबरोबरच वास्तुशिल्पशास्त्र्ा, प्रकाशन, जाहिरात अशा अनेक क्षेत्रात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चित्रकार रवी परांजपे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.