
नगर जिह्यातील संगमनेर तालुक्यामधील एका आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱया मुलीचे त्याच शाळेतील दहावीत शिकणाऱया मुलाशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून मुलगी गरोदर राहिली. याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या दोघांचा विवाह लावून दिला. गेल्या आठवडय़ात पुणे जिह्यातील एका रुग्णालयात ही मुलगी प्रसुत झाली आणि बाळाला जन्म दिला. तिचे वय कमी असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना कळविले. पोलिसांनी मुलीच्या फिर्यादीवरून संबंधित अल्पवयीन मुलगा आणि दोन्ही बाजूंच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































