
गुजरातमध्ये 20 हजार कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त करण्यात आले, मात्र एवढा मोठा साठा सापडूनही त्याची चर्चा झालीच नाही. मात्र क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील आर्यन केसबाबत गाजावाजा झाला. अशाप्रकारे महाराष्ट्रातील मुद्दय़ांचे भांडवल करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे आणि पाडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरुवातीपासूनच सुरू आहेत, अशी टीका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली.
पार्टीचे निमंत्रण, पण गेलो नाही!
मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीसाठी निमंत्रण दिले होते, पण मी पार्टीला गेलो नाही. क्रूझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षड्यंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्यामुळे यासंदर्भात संबंधित एजन्सीने तपास करावा, अशी मागणीही शेख यांनी केली.
…तर मी स्वतः पोलिसांना याची माहिती दिली असती!
मी स्वतः बंदरे खात्याचा मंत्री आहे. मला जर या ड्रग्ज पार्टीची माहिती असती तर मी स्वतः पोलिसांना याबाबत माहिती दिली असती. क्रूझला माझ्या विभागाने परवानगी दिलेली नव्हती. ते राज्य सरकारचे काम नाही. त्यासाठी पेंद्र सरकारची परवानगी लागते, असे शेख यांनी सांगितले.





























































