
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिमाहीत ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) या सरकारी कंपनीने तब्बल 18 हजार 347 कोटी 73 लाख रुपयांचा नफा कमवला असून आतापर्यंतची सर्वात जास्त नफा कमवणारी कंपनी ठरली आहे. गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला 2 हजार 757 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
तिमाहीत सर्वाधिक नफा देणारी कंपनी म्हणून याआधी इंडियन ऑइल कंपनीचे नाव होते. ओएनजीसी गुंतवणूकदारांना 110 टक्क्यांचा लाभांशही देणार आहे. प्रत्येक शेअरवर 5 रुपये 50 पैसे इतका हा लाभांश असणार आहे. ओएनजीसीचा शेअर शुक्रवारी 154च्यावर बंद झाला होता. दरम्यान, 2020-21 या आर्थिक वर्षांत पूर्ण वर्षभरात कंपनीने 11 हजार 246 कोटींचा नफा कमवला आहे.
























































