लेख – भूकंपांची तीव्रता आणि आपत्ती व्यवस्थापन

अतींद्र के. शुक्ला

अलीकडेच नेपाळ, चीन आणि हिंदुस्थानला जाणवलेले भूकंपाचे धक्के हे सौम्य स्वरूपाचे नव्हते. हिमालयाच्या परिसरात भूकंप येणे ही आश्चर्यकारक बाब नसली तरी या नैसर्गिक घटनेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कारण हिमालयाची व्याप्ती अधिक असल्याने आपल्याला तेथील लहान धक्का हा मोठा हादरा देणारा ठरू शकतो. भूकंपातून वाचण्यासाठी आपल्याकडे एक मिनिटापेक्षा कमी वेळ आहे. अशा वेळी आशियात बचावाची सक्षम यंत्रणा उभी करण्यासाठी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या सर्व देशांना एकाच व्यासपीठावर येणे गरजेचे आहे.

नेपाळ, चीन आणि हिंदुस्थानला मध्यंतरी बसलेले भूकंपाचे धक्के ही सामान्य नैसर्गिक घटना नाही. त्याचे केंद्र नेपाळमधील मणिपूर होते. भूगोलाच्या हिशेबाने ‘इंडियन टॅक्टोनेट’ हे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पसरले आहे. त्यात आपला पूर्वोत्तर भाग, हिंदुकुश, अफगाणिस्तान, पाकिस्तानच्या काही भागाचा समावेश आहे. या ठिकाणी इंडियन प्लेट आपल्यापेक्षा वजनाने अधिक असलेल्या युरोशियन प्लेटच्या आत जात असून त्यांचा संघर्ष होत आहे. म्हणून हिमालय वर उचलला जात नसून संपूर्ण भागच भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील होत आहे. या भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी रिश्टर स्केलवर नोंदली गेली आहे, परंतु पूर्वीच्या काळी यापेक्षा अधिक शक्तीशाली मॅग्निटय़ूडचे हादरे बसलेले आहेत. नेपाळमधील 1934चा विनाशकारी भूकंप हे ज्वलंत उदाहरण आहे.

हिमालयाच्या परिसरात भूकंप येणे ही आश्चर्यकारक बाब नसली तरी या नैसर्गिक घटनेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कारण हिमालयाची व्याप्ती अधिक असल्याने आपल्याला तेथील लहान धक्का हा मोठा हादरा देणारा ठरू शकतो. या ठिकाणची स्थिती पाहिल्यास भविष्यात 8 रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप होण्याची शक्यता वर्तविली आहे. साहजिकच तेवढय़ा तीव्रतेचा भूकंप झाल्यास नेपाळ किंवा सीमा भागात किंवा दिल्ली, उत्तर हिंदुस्थानातील राज्यात हाहाकार उडू शकतो. ऑगस्ट 1988 मध्ये बिहारमध्ये झालेला भूकंप आपण विसरलेलो नाही.

सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे भूकंपाचा अंदाज वर्तविला जात नाही.  तसेच किरकोळ धक्क्याच्या आधारे मोठय़ा भूकंपाची शंकादेखील व्यक्त करता येऊ शकत नाही. अर्थात काही तंत्रज्ञानाच्या पातळीवर आणि व्यावहारिक उपाय करता येऊ शकतात. उदा. इशारा देणारी चांगली यंत्रणा. वास्तविक भूकंपात दोन प्रकारच्या लाटा येतात. एक ‘पी’ आणि दुसरी ‘एस’. दोन्हीत वेळेचे अंतर असते. ‘पी’ लाट ही स्वभावामुळे नुकसान करत नाही, मात्र ‘एस’ लाट ही तुलनेने अधिक धोकादायक असते. उदा. दोन टॅक्टोनिक प्लेट्स एकमेकांला धडकतात तेव्हा ‘पी’ लाट तयार होते. उदा. भूकंपाचे पेंद्र नेपाळ असेल तर ‘पी’ वेबला दिल्लीपर्यंत पोचण्यासाठी काही सेपंद लागतील. त्यानंतर ‘एस’ आकाराची लाट तयार होईल. ती सारख्या अंतरानेच दिल्लीला पोचेल. आपण ‘पी’ वेब पेंद्रावर मोजले आणि त्याची तत्काळ माहिती दिल्लीला दिली तर ‘एस’ वेबच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी एक मिनिटापेक्षा कमी वेळ असेल.  यात मेट्रो, अणुऊर्जा पेंद्र, आपत्कालीन आरोग्य सेवा यांसारख्या सेवेचा बचाव करण्यासाठी उपाय करता येऊ शकतो. मेक्सिकोसारख्या देशात अशाच प्रकारची यंत्रणा विकसित केली असून त्यानुसार बचावाचे प्रयत्न केले जातात. तेथे भूकंपापासून वाचण्यासाठी संस्थांना एक ते दीड मिनिटाचा कालावधी लागतो. साहजिकच आशिया खंडात अशा प्रकारची यंत्रणा विकसित करण्यासाठी हिमालय पर्वतरांगांच्या परिसरात असलेल्या सर्व देशांना एका व्यासपीठावर यावे लागेल.

त्याचबरोबर स्थानिक पातळीवरदेखील अनेक उपाय करता येऊ शकतात आणि ते महत्त्वाचे आहेत. उदा. भूकंपविरोधी घर तयार करणे. अर्थात भूकंप हे माणसाचे जीव घेत नाहीत, इमारती घेतात. इमारत तयार करताना त्यात आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास मोठय़ा तीव्रतेचा धक्कादेखील सहन करण्याची शक्ती बाळगू शकतो, परंतु आपल्या देशात ‘बिल्डिंग कोड’ असतानाही त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. साहजिकच कायदा लागू करणाऱया संस्थांची जबाबदारी निश्चित करावी लागेल आणि ‘बिल्डिंग कोड’चे तंतोतंत पालन करण्याबाबत संबंधित संस्थेला सजग राहावे लागेल. भूकंपाच्या दृष्टीने हिंदुस्थानची चार विभागात 2,3,4 आणि 5 अशी विभागणी करण्यात आली आहे. यात विभाग 5 हा संवेदनशील आहे, तर विभाग 2 हा अपेक्षापेक्षा कमी. घर बांधताना या गोष्टीचा विचार करायला हवा.

शहराची अनिर्बंधपणे होणारी वाढदेखील चिंताजनक आहे. दिल्लीत कितीतरी बेकायदा वस्त्या आहेत. यात राहणारी प्रचंड लोकसंख्या ही स्पह्टाच्या ढिगाऱयावर  आहे. दिल्लीत 6.3 रिश्टर स्केलपेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप आलेला आहे. हा भाग विभाग4 चा हिस्सा आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारा भूकंप हा मोठय़ा प्रमाणात जीवित आणि वित्तहानी करू शकतो, अशी शंका आहे. सुदैवाने आतापर्यंत अशा प्रकारची वेळ आपल्यावर आली नाही, पण धोक्याच्या आधारावर  भविष्याचे नियोजन करताना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 2005 मध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम तयार करण्यात आला आणि ही चांगली बाब ठरली. यात आपत्ती येण्यापूर्वी केल्या जाणाऱया उपायांचा समावेश आहे. जनजागृतीवरही भर दिला  आहे. यापूर्वीच्या धोरणात आपत्तीनंतरचे व्यवस्थापन करण्यात आलेले होते. भूकंपामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ‘प्री-डिझास्टर मॅनेजमेंट’ आवश्यक आहे. आइसलँडसारख्या देशात लहानमोठे धक्क्यांचे आकलन केले जाते. त्यामुळे ते आपत्तीचा चांगला सामना करतात. आपण अशा प्रकारचे तंत्र विकसित करू शकत नाही. मात्र बचावाच्या उपायांबाबत गंभीर राहत नुकसानीचे प्रमाण कमी करू शकतो. भूकंप हे असे नैसर्गिक संकट आहे की, ते रोखता येणार नाही, परंतु बचावाचे पर्याय आहेत.

अर्थात भूकंपाचा मोठा धक्का बसल्यानंतर काही कमी तीव्रतेचे धक्के बसतात. यास आपण ‘आफ्टर शॉक’ असे म्हणतो. प्रत्यक्षात जमिनीच्या आत एखादा तुकडा हलतो किंवा जागा बदलतो तेव्हा त्यास ‘सेटल’ होणे किंवा नवीन ठिकाणी स्थिरस्थावर होईपर्यंत लहानमोठे धक्के बसत राहतात, परंतु मोठा धक्का बसल्यानंतर तेवढय़ाच तीव्रतेचा भूकंपाचा हादरा बसेल, असे अनेकांना वाटत राहते. शास्त्रज्ञांनी ही बाब फेटाळून लावली आहे. मोठय़ा भूकंपाने इमारतीला थोडा जरी धक्का लागत असेल तर कदाचित लहान धक्कादेखील आपल्याला मोठा हादरा देऊ शकतो. या कारणामुळेच मंगळवारी मध्यरात्री मोठा धक्का बसल्यानंतर तत्काळ मोठा भूकंप होईल, अशी शक्यता वर्तविली गेली नाही. हिंदुस्थानात आता मोठय़ा तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो या भीतीतून आपल्याला बाहेर यावे लागेल.

(लेखक भूकंप विज्ञान विभागाचे माजी प्रमुख आहेत.)