विभक्त पत्नीवर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न; कोरेगाव पोलिसांत पतीविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरेगाव तालुक्यातील दरे येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वस्त धान्य आणण्यासाठी आलेल्या विभक्त पत्नीवर पतीने रागाच्या भरात कोयत्याने वार केले. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर साताऱ्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल पतीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अनिता परशुराम शिंदे (कय 38) असे जखमी महिलेचे नाव असून, परशुराम नारायण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिता शिंदे या गेली आठ वर्षे पतीपासून विभक्त झाल्या असून, त्या सातारा शहरातील वरंजे उपनगरामध्ये स्वंतंत्रपणे वास्तक्यास आहेत. पती परशुराम शिंदे हा दरे गावचा रहिवासी असून, तेथे त्याचा केल्डिंगचा व्यवसाय आहे. अनिता शिंदे या सकाळी दरे गावात स्वस्त धान्य आणण्यासाठी व आपल्या मावशीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना पाहताच परशुराम शिंदे याने त्यांच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने कार केले. या हल्ल्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर साताऱ्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी परशुराम शिंदे यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला आहे.