शिवसेनेचा मदतयाग सुरू! दवाखाने, पोलिसांसाठी अन्नछत्र!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भूकंप असो वा महापूर… संकट कोणतेही असो.. शिवसेनाप्रमुखांनी केलेला मदतीचा संस्कार शिवसैनिकांना स्वस्थ बसू देत नाही. कोरोना व्हायरसमुळे ओढवलेल्या महाभयंकर संकटातही शिवसैनिक मदतीसाठी रस्त्यावर उतरला आहे. दवाखान्यात असलेले रुग्ण, त्यांचे नातलग, बंदोबस्तावरील पोलीस, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांच्यासाठी चहानाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची सोय शिवसैनिकांनी पदरमोड करून केली आहे. काही शिवसैनिकांनी तर रुग्णांसाठी गेले तीन दिवस घरून तीन वेळेसच्या जेवणाचे डबे पुरवले.

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अवघे जग भयभीत झाले आहे. दिवसेंदिवस हा विषाणू अक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोनामुळे अवघे जग घराच्या चार भिंतीत बंदिस्त झाले आहे. संभाजीनगर मराठवाड्याची राजधानी. मोठमोठे दवाखाने. घाटी रुग्णालय म्हणजे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांचा आधार. कोरोनामुळे शहरात उपचारासाठी आलेले रुग्ण, त्यांचे नातलग रुग्णालयातच अडकले. कोरोनामुळे बाहेर पडण्यास मनाई. त्यातच जमावबंदी. त्यामुळे या लोकांवर उपासमारीचीच वेळ आली.

घरी डबे बनवून पोहोचवले

कोरोनामुळे झालेली रुग्ण व त्यांच्या नातलगांची अवस्था निखील भालेराव, उमेश विसपुते, वैभव विसपुते या शिवसैनिकांच्या कानावर पडली. या तिघांनी सुरूवातीला घरूनच रुग्णालयात डबे पोहोचवायला सुरूवात केली. चहानाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण असे या तिघांनी वाटून घेतले. हेडगेवार हॉस्पिटल, बेंबडे हॉस्पिटल, माणिक हॉस्पिटलमध्ये अडकलेल्या रुग्णांची दोन दिवस पोटापाण्याची सोय झाली.

लोग साथ आते गये और कारवा बनता गया

शिवसैनिक करत असलेल्या मदतीविषयी शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना कळले. मै तो अकेला ही चला था जानिबे मंजिल… लोग साथ आते गये और कारवा बनता गया… राजेंद्र जंजाळ यांनी नाथप्रांगण परिसरातील शिवसैनिकांना आवाज दिला. जसवंत राजपूत, सुनील राऊत, पंडित केंद्रे, राजेंद्र काळे, शुभम काळे, प्रतिक गायकवाड, शुभम साळवे, आदित्य पिल्दे, मच्छिन्द्र देवकर, उदय डोंगरे, सूर्यकांत कोतकर, अनिल यादव, मनीष महाजन, आकाश सुरासे, युवराज चव्हाण, जगदीप पाटील, सुशांत यादव अशी शिवसैनिकांची फौजच जमली. या मदतयज्ञासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला. संचारबंदीच्या काळात शहरातील रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना, बंदोबस्तावरील पोलिसांना तसेच अत्यावश्यक सेवा देणारांना आणि त्याचबरोबर रस्त्यावरील भुकेल्यांसाठी अन्नछत्रच सुरू झाले. राजेंद्र जंजाळ यांनी शिवसैनिकांच्या सोयीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

पोटाची आग शमली…

सकाळी वेगवेगळ्या रुग्णालयात चहा नाश्ता पोहोचला. रात्रीपासून रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांच्या हाती सकाळीच गरमागरम चहाचा कप आणि नाश्त्याची प्लेट आली. लगोलग दुपारचे जेवणही पोहोचते झाले. रात्रीच्या जेवणाची सोय करूनच शिवसैनिक दुसNया दिवशीच्या तयारीला लागले. सगळेच बंद आहे, कुठे जावे, काय खावे या विवंचनेत असलेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातलगांनी पोटाची आग शमताच… शिवसैनिक आहेत तिथे चिंता कशाला… हे बाळासाहेबांचे संभाजीनगर आहे इथे आम्ही उपाशी राहणार नाही याची खात्री पटली… असा भरभरून आशीर्वाद दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. मदत करणे हा शिवसेनेचा धर्मच आहे. या शहरात कुणीही उपाशी राहता कामा नये याच विचारातून हे काम सुरू करण्यात आले. हे पुढेही चालू राहणार आहे. – राजेंद्र जंजाळ, उपमहापौर

शिवसेनाप्रमुखांचे हे संभाजीनगर आहे. येथे येणाNया माणसावर उपाशी राहण्याची वेळ येता कामा नये म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये डबे द्यायला सुरूवात केली. मदत करणे हे आमचे कामच आहे, ते पुढेही चालू राहील. – निखील भालेराव, शिवसैनिक