केळीच्या सालीचे पाणी केसांसाठी प्रचंड उपयोगी, वाचा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांब आणि सुंदर केस प्रत्येकालाच हवे असतात.आज आम्ही तुमच्यासाठी केळीच्या सालीचं पाणी घेऊन आलो आहोत. केळीमध्ये कॅटेचिनसारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे केसांच्या पेशींचे नुकसान टाळण्यास मदत करते. केसांना केळीच्या सालीचे पाणी लावल्याने केस अकाली पांढरे होणे, पातळ होणे, कोरडेपणा आणि दुहेरी केस टाळण्यास मदत होते. इतकंच नाही तर केसांमध्ये हे पाणी लावल्याने केसांना चमक येते. यासोबतच केळीमध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात जे आपल्या केसांना इन्फेक्शन आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. केसांमध्ये या पाण्याचा वापर केल्याने कोंडा, चिडचिड आणि खाज सुटणे यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होते.

केळीच्या सालीचे पाणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य-
2 केळीची साले , पाणी 3 कप

केळीच्या सालीचे पाणी कसे बनवावे?
केळीच्या सालीचे पाणी बनवण्यासाठी प्रथम कढईत पाणी घालून अर्धे होईपर्यंत उकळावे, पाणी कोमट होऊ द्यावे. नंतर त्यात २ केळीची साले घालून रात्रभर भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी एकदा मिसळून स्प्रे बाटलीत भरून घ्यावे.

केळीच्या सालीचे पाणी केसांना कसे लावावे?
केळीच्या सालीचे पाणी तुम्ही केसांमध्ये कंडिशनर म्हणून लावू शकता.
हवं असेल तर केसांमध्ये स्प्रे करून थोडा वेळ सोडा.
यानंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवावेत.