
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात खेळला जाणारा पाचवा कसोटी सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआय आणि ईसीबीने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. याबाबत बीसीसीआयने आपले अधिकृत स्टेटमेंट जारी केले आहे.
बीसीसीआय आणि ईसीबीने संयुक्तपणे हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये मँचेस्टर येथे खेळला जाणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये लढतीबाबत अनेक बैठका झाल्या. मात्र कोविड-19 च्या वाढत्या पार्दुर्भावामुळे ओल्ड ट्रॅफर्डवर खेळला जाणारा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे बीसीसीआयने म्हटले.
बीसीसीआय आणि ईसीबीमधील संबंध मजबूत आहेत. त्यामुळे हा सामना अन्य कधीतरी पुन्हा खेळवला जावा, अशी ऑफर बीसीसीआयने ईसीबीला दिली आहे. हा सामना पुन्हा खेळला जावा यासाठी दोन्ही बोर्ड नवीन मार्ग शोधत आहे, असेही बीसीसीआयने म्हटले.
INDvENG Test Match अखेरचा कसोटी सामना रद्द, मालिकेचा विजेता कोण?
खेळाडूंच्या सुरक्षेला प्राधान्य
दरम्यान, बीसीसीआयने नेहमीच आपल्या खेळाडूंच्या सुरक्षेला आणि कल्याणाला प्राधान्य दिले आहे. या गोष्टीसोबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही बीसीसीआयने म्हटले.
चाहत्यांची मागितली माफी
बीसीसीआयने या कठीण काळाय ईसीबीने केलेल्या सहकार्याबाबत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच ही मालिका पूर्ण न करू शकल्याबद्दल बीसीसीआयने चाहत्यांची माफीही मागितली.
Update: The BCCI and ECB held several rounds of discussion to find a way to play the match, however, the outbreak of Covid-19 in the Indian team contingent forced the decision of calling off the Old Trafford Test.
Details: https://t.co/5EiVOPPOBB
— BCCI (@BCCI) September 10, 2021
























































