सामना प्रतिनिधी, बेळगाव
सीमावासीयांची ताकद दाखवून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती या लोकसभा निवडणुकीसाठी 101 उमेदवार बेळगाव मतदारसंघातून उभे करणार आहे असे या समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितले. येथील मराठा मंदिरमध्ये समितीची बैठक झाली तेव्हा ते बोलत होते. या बैठकीत 30 जणांनी उमेदवार होण्याची तयारी दर्शविली. उमेदवारांसाठीची अनामत रक्कम लोकवर्गणीतून गोळा करण्यात येणार आहे.
ईव्हीएम जास्त लागणार
1996 मध्ये म. ए. समितीने 452 उमेदवार उभे केले होते. त्यामुळे एकूण 546 उमेदवार रिंगणात होते. उमेदवारांची संख्या पाहून निवडणूक एक महिना पुढे ढकलून जम्बो मतपत्रिका निवडणूक आयोगाला छापून घ्यावी लागली होती. या निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मतदान घेतले जाणार आहे. समितीचे 101 उमेदवार उभे राहिले तर निवडणूक आयोगाला अनेक ईव्हीएम मतदानासाठी ठेवावे लागतील.
























































