सीताफळ खाण्याचे गुणकारी फायदे, वाचा एका क्लिकवर

4848

हिवाळा ऋतू म्हटलं की आपल्याला मधूर गर असणारे सीताफळ आठवते. सध्या बाजारात सीताफळाची आवाकही वाढली आहे. पिकलेले सीताफळ खाण्याची मजाच काही और असते. यासह खीर, आईस्क्रिम, रबडी, श्रीखंड अशा विविध मिठाईंमध्ये सीताफळाचा वापर केला जातो. सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदेही आहेत.

सीताफळाचे गुणकारी फायदे –

1) सीताफळामध्ये व्हिटॅमीन ‘बी-6’ आणि ‘ए’ चे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अस्थमाचा त्रास कमी होतो.

2) अॅसिडीटीच्या समस्या असेल तर सीताफळ हे गुणकारी आहे. शरिरातली उष्णता, छातीत व पोटात जळजळ होणे ही लक्षणे जाणवत असल्यास सीताफळाचे सेवन करावे.

3) शरिरामध्ये अशक्तपणा जाणवत असेल तर अशावेळी सीताफळाचे सेवन केल्याने अशक्तपणा निघून जातो.

4) ह्रदयाच्या सर्व आजारांवर सीताफळ खाणे फायदेशीर असते.

5) सीताफळ खाल्ल्याने शरिरातील रक्ताच पातळी योग्य राखण्यास मदत होते.

6) वजन वाढवयाचे असेल त्यांनी सीताफळाचे सेवन केले पाहिजे.

7) अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस फायदेशीर असतो.

8) सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरिराला ताकद मिळते.

9) नियमित सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते.

आपली प्रतिक्रिया द्या