
सामना प्रतिनिधी । कराड
कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्णा सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाबद्दल कोल्हापूर येथील कर्नाड बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फौंडेशनकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते कोल्हापूर येथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात कृष्णा बँकेच्या संचालकांनी व पदाधिकार्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कोल्हापूरातील कर्नाड बँकिंग रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फौंडेशनने राज्यातील 250 ते 500 कोटी रूपयांपर्यंत व्यवसाय करणार्या नागरी सहकारी बँकांची पाहणी करून, या व्यवसाय विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन करणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची निवड या पुरस्कारासाठी केली. बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, संचालक शिवाजीराव थोरात, नामदेवराव कदम, अॅड. विजयकुमार पाटील, बँकेचे व्यवस्थापक जी. बी. वाटेगावकर, भगवान जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, माजी सहकार आयुक्त दिनेश ओऊळकर, फौंडेशनचे अध्यक्ष किरण कर्नाड, माधवी कर्नाड यांच्यासह बँकींग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

































































