वैभव नाईक यांच्या माध्यमातून भडगाव खुर्द रवळनाथ मंदिर रस्त्याकरिता १० लाखांचा निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कुडाळ

शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील भडगाव खुर्द मुख्य रस्ता ते रवळनाथ मंदिर देऊळवाडी जाणाऱ्या रस्त्याकरिता जिल्हा वार्षिक योजनेतून १० लाखांचा निधी मंजूर करून दिला. व प्रत्यक्षात आज या रस्त्याचे कामही पूर्ण झाले असून याबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

भडगाव खुर्द रवळनाथ मंदिर जवळ जाणारा ग्रामीण मार्ग हा अत्यंत नादुरुस्त झालेला होता. सदर रस्त्याने पायी ये – जा करणेही कठीण बनले होते. याबाबत हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी मागणी वारंवार ग्रामस्थांकडून होत होती. जत्रोत्सवानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी या मंदिरास भेट दिली असता रस्त्याची झालेली दुरावस्था त्यांच्या निदर्शनास आली. याची तात्काळ दखल घेऊन या रस्त्याकरिता १० लाखांचा निधी मंजूर करण्याचे आश्वासन आ. वैभव नाईक यांनी दिले. व आपल्या माध्यमातून हा रस्ता पूर्ण केल्यावरच आपण या वाडीमध्ये व मंदिरामध्ये पुन्हा भेट देऊ असे यावेळी आमदार महोदयांनी सांगितले. याबाबत भडगाव उपसरपंच तुळशीदास गुरव (बाबी) यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आणि अगदी दिलेला शब्द पाळत काहीच महिन्यात आ. वैभव नाईक यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून तब्बल १० लाखांचा भरघोस निधी मंजूर करून दिला. यानंतर अल्पावधीत या कामाबाबत इतर सर्व तांत्रिक गोष्टी पूर्ण करून घेण्यात आल्या. श्री देव रवळनाथ मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताहा करिता मंदिरात येणाऱ्या भाविकांची व ग्रामस्थांची अडचण दूर व्हावी या उद्देशाने सरपंच सौ. प्रणिता गुरव, उपसरपंच तुळशीदास गुरव यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात काम पूर्ण करून घेतले. आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे काम पूर्ण होताच आमदार वैभव नाईक यांनी या मंदिरास भेट दिली. यावेळी गावातील प्रमुख मानकरी व सर्व ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचा सत्कार केला व आभार मानले.