
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील इंडिगो एअरलाईन्सला भारतीय कामगार सेनेने चांगलाच दणका दिला आहे. गोवा आणि मुंबईतील कर्मचार्यांनी सुरु केलेल्या काम बंद आंदोलनानंतर व्यवस्थापनाला माघार घेत कामावरुन कमी केलेल्या कर्मचार्यांना पुन्हा सेवेत दाखल करुन घेतले असून इंडिगोवर भारतीय कामगार सेनेचा भगवा फडकला आहे.
गोव्यातील इंडिगो एअरलाईनसच्या कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय कामगार सेनेचे सदस्यत्व मोठया प्रमाणात स्वीकारले होते. त्यानंतर इंडिगो एअरलाईनसच्या व्यवस्थापन अस्वस्थ झाले. त्यांनी कोणतेही सबळ कारण नसताना 5 कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले. यावर भारतीय कामगार सेनेचे स्थायीय पदाधिकारी योगेश आवळे यांनी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडून गोव्यातील इंडिगो एअरलाइन्सची सेवा ठप्पा केली. हे कळताच इंडिगो एअरलाईन्सची मुंबईतील सेवा ही ठप्प करण्यात आली. अखेर इंडिगो एअरलाईन्सच्या व्यवस्थापनाने सेवामुक्त केलेल्या 5 ही कर्मचार्यांना पुन्हा सेवेत समावून घेण्यात आले.
हीच तर बाळासाहेबांची शिकवण
इंडिगो एअरलाईनसच्या तमाम कर्मचाऱयांनी एकजूठ दाखविल्याबद्दल भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हीच शिकवण असून एकजुटीने रहा आणि न्याय मिळवा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
300 कामगारांनी केला प्रवेश
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत, सरचिटणीस सचिन अहिर यांच्या सहकार्याने 300 कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे कार्यकारणी सदस्य योगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली या कामगारांनी हाती शिवधनुष्य बांधून भारतीय कामगार सेनेत प्रवेश केला होता.
























































