भावलीत पर्यटकांवर हल्ला, गुंडांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इगतपुरीतील भावली येथे पर्यटक कुटुंबाचा पाठलाग करून, कारची तोडफोड करून, जीवघेणा हल्ला करणाऱ्या नऊ गुंडांना न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नाशिकरोड परिसरातील एक कुटुंब भावली धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. महिलेची छेड काढल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने गुंडांनी या कारचा पंधरा किलोमीटर पाठलाग केला व तोडफोड केली. पोलिसांनी इगतपुरी तालुक्यातील गिरणारे येथील विशाल भटाटे (२७), अनिकेत मानवेढे (२४), नांदगाव सदो येथील अनिरुद्ध भागडे (२५), माणिकखांब येथील सागर गीते (२२), सचिन आडोळे (२९), अर्जुन आडोळे (२५), बलाईदुरीचा देवीदास भगत (२५), देवळे घोटी येथील अजय दालभगत (२०), इगतपुरी गावठा येथील विनोद बोराडे (२६) यांना अटक केली.