कुख्यात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार, भीमा-कोरेगाव प्रकरणात होता मुख्य आरोपी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा कोरेगाव दंगलीतील मुख्य आरोपी मिलिंद तेलतुंबडे याचा आज गडचिरोलीत झालेल्या चकमकीत खात्मा झाला आहे. न्यूज 18 ने त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. तेलतुंबडे याच्यावर 50 लाखांचे बक्षिस होते.

भीमा कोरेगाव तसेच एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ जणांविरोधात ‘एनआयए’ने मुंबईतील सत्र न्यायालयात  आरोपपत्र दाखल केलेले आहे. त्यात मिलिंद तेलतुंबडे याचा देखील समावेश होता. तसेच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ 1 मे रोजी नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांचे वाहन भूसुरूंग स्फोट घडवून उडवले होते. त्या प्रकरणात देखील मिलिंद तेलतुंबडेवर गुन्हा दाखल आहे.