अमली पदार्थांचा विळखा पडलेल्या भिवंडीत गुजरात दहशतवादविरोधी पथकाने मोठी कारवाई केली. तब्बल ८०० कोटी किमतीचा ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल अशा दोघा तस्करांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तस्करांनी शहरातील एका मध्यवर्ती इमारतीत ड्रग्ज फॅक्टरी थाटल्याने पोलीस चक्रावून गेले. विशेष म्हणजे इतकी मोठी कारवाई होऊनही स्थानिक पोलिसांना काहीच माहिती नव्हती. दोन दिवसांनंतर त्यांना या धाडीची माहिती एटीएसने दिली.
काही दिवसांपूर्वी सुरतच्या हद्दीतील पलसाना करेली गावात अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईदरम्यान गुजरात एटीएसला भिवंडी शहरातील नदी नाका येथील फरिद मंजिल या इमारतीमध्ये एमडीचे गोडाऊन असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर गुजरात एटीएस पथकाने अत्यंत गुप्तता पाळून
भिवंडीत छापा टाकला. फरिद मंजिल ही सात मजली इमारत कामवारी नदीकिनारी उभारण्यात येत आहे. इमारतीचे बांधकाम अपूर्ण आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल यांनी एक मोठा फ्लॅट भाड्याने घेतला होता. परंतु हे दोघे तेथे न राहता त्यांनी गोडाऊन केले होते. स्थानिक निजामपूर पोलीस चौकी एमडी साठा जप्त केलेल्या इमारतीपासून अवघ्या ५० मीटरवर आहे. मात्र त्यांना कानोकान काहीच खबर नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
म्हणे हा साबणासाठीचा सोडा
इमारतीचे मूळ जमीनमालक मुसद्दीक फरिद यांनी २८ जुलै रोजी रात्री इमारतीच्या तळमजल्यावर आरोपी मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल या दोघांना ५० किलोच्या ५ ते ६ ड्रममध्ये पावडर घेऊन येत असताना पाहिले. त्यावेळी या दोघांना मुसद्दीक फरिद यांनी हटकले. ही इमारत राहण्यासाठी आहे, गोडाऊनसाठी नाही. काय घेऊन चालला म्हणत हटकले होते. यावर आरोपींनी ड्रममध्ये साबण बनवण्यासाठीचा कॉस्टिक सोडा असल्याचे सांगितले. आरोपींसोबत ड्रम घेऊन आलेले हमाल टापटीप कपडे घातलेले होते. त्यामुळे फरिद यांना संशय आला होता. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्याचवेळी जर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली