
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी दिल्लीतील ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीला उपस्थित न राहणार असल्याचं वृत्त ‘Utter Nonsense’ म्हणत फेटाळून लावलं. बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुरुवातीला नियोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, ताप असल्यानं मी बैठकीसाठी होकार देऊ शकलो नाही. आरजेडी प्रमुख लालू यादव यांच्या म्हणण्यानुसार आता 17 डिसेंबरला ‘इंडिया आघाडा’ची बैठक होणार आहे.
नितीश कुमार म्हणाले की, ‘मी इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ही मूर्खपणाची गोष्ट आहे. मला त्यावेळी ताप आला होता. पुढील बैठक होईल तेव्हा मी नक्की जाईन’, असं नितीश कुमार म्हणाले.

























































