कॉलेजात विद्यार्थांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कणकवली

खासगी, अनुदानित, विना अनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने टप्याटप्यात घेण्याचे सुरू करण्यात येणार आहे.

२०१८-२०१९ मध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर व संभाजीनगर या पाच विभागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही पद्धत लागू असणार आहे. महाविद्यालयांनी यंत्रसामुग्री एका महिन्याच्या आत स्वतः उपलब्ध करून घ्यावयाची आहे.