वाढदिवसाची पार्टी जिवावर बेतली; कोंडेश्कर धबधब्यात घाटकोपरचे चार तरुण बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sunk_drawn

वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले चौघे जण बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यात बुडाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

मुंबईच्या घाटकोपर येथील कामराजनगर भागात राहणाऱया आकाश झिंगा (19) याचा वाढदिवस असल्याने त्याच्यासोबत स्वयम मांजरेकर (18), सूरज साळवे (19), लीनस उच्चपवार (19) हे मित्र कोंडेश्वर धबधब्यावर आले होते. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या चौघांना अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांच्या इतर मित्रांनी चौघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढून बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेची कुळगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.