
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्य़े होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशमध्ये 123 आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 54 जागांवर भाजपने उमेदवार उतरवले आहेत. बाकी जागांवरील उमेदवारांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीमध्ये अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू मुक्तो विधानसभा क्षेत्रातून मैदानात उतरले आहेत.
BJP releases its list of candidates for the 123 seats of Andhra Pradesh for upcoming legislative assembly elections pic.twitter.com/XTxs2RDvSJ
— ANI (@ANI) March 17, 2019
BJP releases its list of candidates for the 123 seats of Andhra Pradesh for upcoming legislative assembly elections pic.twitter.com/A3kkwBhQI8
— ANI (@ANI) March 17, 2019
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याबरोबरच चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रकही जाहीर केले. अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, सिक्किम आणि ओडिशा राज्यामध्ये लोकसभेसोबत विधानसभा निवडणूक होणार आहे. आंध्र प्रदेश आणि अरुणाचलमध्ये 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होईल, 23 मे ला निकाल लागणार आहे.
आंध्रातील पहिलीच विधानसभा निवडणूक
तेलंगनापासून वेगळे झाल्यानंतर आंध्र प्रदेशध्ये पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारविरोधात दंड थोपटणारे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
अरुणाचलमध्ये 60 विधानसभा जागा आहेत,तर आंध्र प्रदेशमध्ये 175 विधानसभा जागा आहेत.
























































