
सामना प्रतिनिधी । नाशिक
अयोध्येत रामजन्मभूमीतच श्रीरामाचे मंदिर व्हावे, ही शिवसेनेचीच भूमिका आहे, पण भाजपने राम मंदिराचे नुसतेच राजकारण केले आणि सत्ता मिळविली, असा आरोप शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केला.
शिवसेनेच्या वतीने आयोजित सडेतोड वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सोमवारी प्रारंभ झाला. त्याप्रसंगी नितीन बानगुडे पाटील बोलत होते. सुरुवातीला त्यांनी या स्पर्धेचे महत्त्व विषद केले. कमीत कमी वेळेत चांगले वक्तृत्व कसे करावे याचे मार्गदर्शन केले. यानंतर त्यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र् सोडले. शिवसेनेचे चिन्ह हे धनुष्यबाण आहे. धनुष्यातून सुटलेला बाण जसा परत घेता येत नाही, त्याप्रमाणे शिवसेना दिलेला शब्द परत घेत नाही, तो पूर्ण करते. शिवसेना जे बोलते तेच करते. फसव्या घोषणा करीत नाही, असा टोला त्यांनी भाजपाला हाणला.
या कार्यक्रमाला उपनेते बबनराव घोलप, मारुती साळुंखे, माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, महानगर संघटक राहुल दराडे, नगरसेविका श्यामला दीक्षित, भारती जाधव, मंगला भास्कर, वैशाली राठोड, सुभाष गायधनी, नाना पाटील, नितीन चिडे, योगेश बेलदार, सुनील पाटील, सुनील गोडसे, सुधीर कराड, रमेश उघडे, वीरेंद्र टिळे, गणेश बर्वे, अजय चौघुले, संदेश फुले, श्रद्धा जोशी, योगिता आहेर, शैलेश सूर्यवंशी, नीलेश मोरे, स्वप्नील औटे, विकास ढोकोलिया, पोपट शिंदे, सुनील निरगुडे, लखन कुमावत, उमेश चव्हाण, कमलेश परदेशी, दिलीप मोरे, दत्ता दंडगव्हाळ, सचिन चौघुले, गजेंद्र चव्हाण आदी हजर होते.





























































