भाजपचे मनसुबे धुळीस, वाटद ग्रामपंचायत सरपंच शिवसेनेत

रत्नागिरी निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर फोडाफोडीचे राजकारण करुन ग्रामपंचायती बळकावण्याचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. वाटद ग्रामपंचायत सरपंच अंजली विभुते यांनी आज शिवसेना उपनेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला़. विभुते यांच्या शिवसेना प्रवेशामुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

ग्रामपंचायत निवडणूकीत वाटद ग्रामपंचायत ही शिवसेनेने निर्विवाद जिंकली असताना सरपंच निवडीच्या वेळी फोडाफोडीचे राजकारण ग्रामपंचायत बळकावण्याचा प्रयत्न भाजपने केला होता. वाटद ग्रामपंचायत आपण जिंकल्याचा भाजपचा हा रंग दोन महिने टिकला़. वाटद ग्रामपंचायत सरपंच अंजली विभुते यांनी आज पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

त्यामुळे वाटद ग्रामपंचायतीवरही आता शिवसेनेचा भगवा फडकला आहे. सरपंच अंजली विभुते यांनी आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, जि.प.सदस्या ऋतुजा जाधव, उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपसभापती उत्तम सावंत, नगरसेवक राजन शेट्ये, विभागप्रमुख योगेंद्र कल्याणकर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या